अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) आज दि 18 जाने 24 रोजी पार पडत असलेल्या मसापच्या दुसऱ्या नांदेड जिल्ह्य साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, ग्रामीण कवी शंकर वाडेवाले यांनी अहमदपूरकरांना दि 16 जाने 24 रोजी संध्याकाळी धावती भेट दिली.
मसापच्या वतीने आयोजित केलेले हे दुसरे जिल्हा मराठी साहित्य संमेलन होय. महाकवी विष्णुदास यांच्या पुन्यदिनानिमित्त माहुरगड परिसरात हे संमेलन पार पडत आहे. स्वागताध्यक्ष विजयकुमार भोपी आहेत. कवी शंकर वाडेवाले यांच्या संपूर्ण साहित्यात शेतकरी व कष्टकऱ्यांचे जीवन हा लेखनाचा मुळ स्तोत्र आलेला आहे. कढवाई, आभाळमाती, माती बोले गुज,मायीचं गाणं, देह चंदणाचा, थेंब थेंब पाऊस, यासारखे दर्जेदार कवितासंग्रह गुरं आणि गोठा, हा कथासंग्रह आणि इतर संपादित ग्रंथ अशी विपुल लेखन संपदा त्यांच्या नावावर आहे.
मंगळवारी सकाळी राजर्षी शाहू महाविद्यालयात त्यांच्या सत्काराचा आणि व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परतीच्या प्रवासात त्यांनी अहमदपूरकरांना धावती भेट दिली. त्यावेळी पुसापचे सर्वेसर्वा आणि लोकशाहीकार एन डी राठोड, जेष्ठ विचारवंत साहित्यिक सुनील खंडाळीकर, विद्रोही कवी प्रफुल्ल धामणगावकर आणि मुक्त मंथन या त्रैमासिकाचे अहमदपूर प्रतिनिधी बालाजी वाघमारे यांनी त्यांना अमंळनेर येथे नियोजित असलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे कँलेंडर भेट देऊन स्वागत केले.