अहमदपूर : ( प्रा भगवान आमलापुरे ) साहित्य संमेलन छोटे असो की मोठे त्यातून साहित्य आणि समाजात चैतन्य निर्माण होते. असे प्रतिपादन बाबासाहेब मोरे यांनी केले.
ते दि 14 जाने 24 रोजी संध्याकाळी आयोजित झुम मिटींगमध्ये ( आभासी बैठकीत ) बोलत होते. दि 26 आणि 27 फेब्रु 24 रोजी हैदराबाद येथे 04 थ्या अखिल भारतीय गौरबंजारा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संमेलनाच्या पुर्वतयारी संदर्भात या आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सबंध मराठवाड्यातून चांगला प्रतिसाद मिळाला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की केवळ सुचलं म्हणून नाही तर आपल्या लेखणीतून काहीतरी विधायक पणती पेटवायची आहे यासाठी प्रयत्न केला पाहिजे.बाबासाहेब मोरे यांना या वेळी सांगितले की लेखक हा कोणाचा गुलाम नसतो.आपण दैनंदिन जीवनात लिखाण करत राहणे गरजेचे आहे.
या आभासी बैठकीची तांत्रिक बाजू कवी विजय पवार यांनी सांभाळली. प्रास्ताविक एन डी राठोड यांनी केले. तर आभार भगवान आमलापूरे यांनी मानले.