फक्त शरीरसुखासाठीच प्रेम असतं का ??
नंदा नावाची माझी वाचक.. गेली अनेक वर्षे ती मला आणि माझ्या विचारांना फॉलो करत आहे.. वय वर्षे ५७ .. ९ वर्षांपूर्वी त्यांचे यजमान एका ॲक्सीडंट मधे गेले..त्यांना मुल नाही त्यानंतर काही महिन्याने ऑफीसमधेच एका पुरुषाच्या संपर्कात आल्या.. मैत्री झाली आणि पुढे जाऊन प्रेमही .. प्रेम झाल्यानंतर दोघांना शारीरिक गरजा होत्या त्यामुळे ते जास्त जवळ आले.
अनेक वर्षे एकमेकांना सगळी सुखं देत राहिले आणि काही महिन्यांपूर्वी नंदा त्यांना म्हणाल्या , आपलं प्रेम आहेच.. इतकी वर्षे आपण शारीरिकदृष्ट्या जवळ आलो आता मला फक्त प्रेम हवय.. फीजीकल चा कंटाळा आलाय.. त्यांच्या मित्राचं वय ५९ आहे.. आता थांबु आणि फक्त प्रेम करु असं त्या म्हणाल्या..त्यावर त्यांच्या मित्राची फारशी काही रीॲक्षन आली नाही.. नंदाला वाटलं त्यांना हे आवडलं असेल , पटलही असेल.
काही दिवसांतच त्यांनी नंदाशी बोलणं कमी करायला सुरुवात केली.. वागण्या बोलण्यात थोडा तुटकपणा यायला लागला..ऑफीसमधे एकत्र चहा व्हायचा , डबे एकत्र खाल्ले जायचे ते प्रमाण कमी झालं.. इतकी वर्षे जर खरच प्रेम होतं तर शारिरिक गरजा संपल्यावर ते संपलं कसं ?? ,.. हा त्यांचा प्रश्न आणि यावर मी लिहावं अशी त्यांची इच्छा.. पुढे त्या म्हणाल्या , सोनल मॅम तुम्हाला पुरूष आवडतात ना.. तुम्ही पुरुषांवर प्रेम करता ना मग या मानसिकतेवर वाचायला आवडेल असं बोलुन त्यांनी फोन ठेउन दिला.. त्या झोपल्या पण मी बराच वेळ यावर विचार करत होते.. फक्त शरीरसुखासाठीच प्रेम असतं का ??
प्रत्येकवेळी अशीच सिच्युएशन असेल असच नाही.. प्रत्येक पुरूष असाच असेल असही नाही.. पण बऱ्याचदा हे होतं हेही मान्य करायलाच लागेल.. घरात काही कारणाने मिळत नाही म्हणुन स्त्री किवा पुरूष बाहेर जातातच पण नवरा बायको असतील आणि नवरा बायको नसले तरीही खरं प्रेम असेल तर असं व्हायला नको.. पण मग नंदाच्या बाबतीत का झालं असेल ??.. प्रेम नव्हतं का ??.. की त्यांना सेक्सशिवाय प्रेम नको होतं.. गरज सरो वैद्य मरो असाच आजचा जमानाही आहे .. तिने पुन्हा ते सुख द्यायला सुरुवात केली तर नातं सुरळीत होइल का ??..
पण शारीरिक सुखासाठी शरीर आणि मन एका ठरावीक वयानंतर थकतं पण प्रेमासाठी वयाचं बंधन नाही.. नंदाला नवरा नाही. मुलं नाहीत याचा विचार पण त्यांनी करायला हवा.. जेव्हा तिला शक्य होतं तेव्हा तिने भरभरुन हे सुख दिलच की त्यामुळे तिच्या मनाचाही विचार त्यांच्याकडुन व्हायला हवाच ना.. नाती फार क्लीष्ट असतात आणि प्रत्येक व्यक्तीगणिक ती बदलतात.. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असेल तरीही माणुसकी नावाची गोष्ट आपल्याकडे असायलाच हवी ना..
काही लोक तर जनावरं म्हातारी झाली की रस्त्यावर सोडुन देतात त्यातलाच हा प्रकार .. खूपच त्रासदायक आहे त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडं नमतं घ्यावं लागलं तरीही चालेल पण नवरा बायकोत वितुष्ट येउ देउ नका.. ते नातं खुप सुंदर आहे ते जपा.. नंदाचा नवरा गेला यात त्यांचा दोष नाही पण इतर व्यक्तीसोबत नातं जोडताना काळजीपुर्वक पुढे जा..
प्रत्येकवेळी पुरुषांचीच चुक नसते.. स्त्रीही दोषी असु शकते. विषय खुप मोठा आहे .. एका लेखात मांडणं खूपच अवघड आहे.. जरुर शेअर करा.. नाती जपा…
सोनल गोडबोले