जाक्रं/पंसक/गशिअ//आस्था-०१/पीएमपोषण/९९/2024
शिक्षण विभाग ,पंचायत समिती कंधार
दिनांक: 16/01/2024
प्रति,
मुख्याध्यापक सर्व,
पीएम पोषण योजना, प स कंधार.
विषयः- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांना पुरवठा करण्यात आलेल्या तांदूळ व
धान्यादी माल चांगला असल्याची खात्री करणे बाबत.
संदर्भ:- १. मा.शिक्षणाधिकारी प्रा जि प नांदेड यांचे पत्र क्रं ४५१ दिनांक १५.०१.२०२४
उपरोक्त विषयी संदर्भिय पत्रान्वये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये तालुक्यातील एखादया शाळेस तांदुळ व धान्यादी माल निकृष्ट दर्जाचा पुरवठा होत असल्यास तात्काळ संबंधित मुख्याध्यापक यांनी लेखी कळवुन तांदुळ व धान्यादी माल न घेता तो बदलुन घेणेबाबत मा.शिक्षणाधिकारी (प्रा.)जिल्हा परिषद नांदेड यांनी त्यांच्या संदर्भिय पत्रामध्ये नमुद केले आहे.तसेच स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी शाळेतील तांदुळ व धान्यादी मालाची साफसफाई करण्याचे त्यांच्या कामामध्ये तसे नमुद केले असुन शाळेतील तांदुळ व धान्य साहित्य खराब होऊ नये याची काळजी मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी घ्यावयाची असुन त्यांची जबाबदारी पण राहणार आहे असे सुचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
करीता वरिल सुचनेच्या अनुषंगाने सर्व मुख्याध्यापक यांनी यापुढे निकृष्ट दर्जाचा तांदुळ व धान्य प्राप्त झाल्यास तो परत करावा व चांगल्या प्रतिचे तांदुळ व धान्य साहित्य प्राप्त करुन घ्यावे.तसेच संबंधीत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना आपल्यास्तरावरुन वेळोवेळी तांदुळ व धान्यादी मालाची साफसफाई करण्याच्या सुचना देण्यात याव्यात.भविष्यात शालेय पोषण आहार खराब होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.यात कोणी दोषी आढळल्यास संबंधितांस जबाबदार धरण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी..
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती कंधार
प्रतिलिपी:-
१. मा.शिक्षणाधिकारी (प्रा),जिल्हा परिषद नांदेड यांना माहितीस्तव सविनय सेवेत सादर.
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती कंधार