लहुजी साळवे अनाथाश्रमात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते अनाथ मुलांना स्वेटर व मिठाई वाटप

नांदेड : प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी लहुजी साळवे अनाथाश्रमात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यानंतर अनाथ मुलांना स्वेटर व मिठाई वाटप तसेच दुपारी संध्या छाया वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून स्वेटर वाटप करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षापासून दिलीप ठाकूर यांच्या हस्ते धनगर वाडी येथील लहुजी साळवे निराश्रित व निराधार बालकाश्रमात ध्वजारोहण करण्यात येते. दरवर्षी या निमित्त विविध वस्तूंचे वाटप करण्यात येते. यावर्षी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा युवा मोर्चाचे शिवा लोट तर प्रमुख अतिथी म्हणून लायन्सचे अरुणकुमार काबरा, सविता काबरा, संस्थेचे लालबाजी घाटे व रेखा घाटे हे उपस्थित होते. अल्पबचत महिला प्रधान संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सचिन शिवलाड यांच्यातर्फे सर्व मुलांना व कर्मचाऱ्यांना स्वेटर देण्यात आले. भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्यातर्फे मिठाई वाटप करण्यात आली.

दिलीप ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ व प्रामाणिक राहण्याची, देश प्रेमाची शपथ दिली. या प्रसंगी दिलीप ठाकूर ,शिवा लोट, सविता काबरा यांची समयोचित भाषणे झाली. मुलांनी विविध गुण दर्शनाचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लालबाजी घाटे यांनी तर आभारप्रदर्शन संदेश यादव यांनी केले. याप्रसंगी भुजंग नामपल्ले, प्रतिभा जाधव यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.

दुपारी संध्याछाया वृद्धाश्रमात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी
ॲड. दिलीप ठाकूर, प्रतिष्ठित नागरिक गीताराम अग्रवाल, दानशूर नागरिक प्रकाश सेठीया,भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांची प्रमुख उपस्थिती होती.गेल्या पंचवीस वर्षापासून दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून वृद्धाश्रमात वेगळे कार्यक्रम घेऊन ज्येष्ठ नागरिकांना नियमित मदत केली जाते.

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक विक्रम टरके पाटील यांनी केले. दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांनी आपल्या भाषणातून ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधला. यानंतर गीताराम अग्रवाल यांच्यातर्फे सर्वांना स्वेटर वाटप करण्यात आले. कडाक्याची थंडी पडली असल्यामुळे उबदार स्वेटर मिळाल्याने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक व अनाथाश्रमातील बालकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *