कधीही जाती धर्मावर न लिहीणारी मी सारस्वतांवर लिहावं वाटतय.. कारण माझा जन्म सारस्वत घरात झाला त्यामुळे जवळपास सगळेच नातेवाईक सारस्वत .. मासेहारी म्हणा ना पण या जातीला मी कलंक कारण मी शाकाहारी .. माझे आजोबा , भाऊ , भाचे , बाबा सगळेच शाकाहारी पण माझी आई माश्याच्या वासावर जेवणार .. आणि जगणारही..
आई ॲडमीट म्हटल्यावर सतत ३ दिवस हॉस्पिटलमधे नातेवाईकांची नुसती रिघ लागली.. इतके सगळे नातेवाईक रत्नागिरीत रहातात हे मला काल परवा कळलं..
आमच्याकडे रोज ५/१० माणसे अशीच जेवुन जातात.. दोन माणसांचा डबा सांगितला तर तो ४ जणांचा येतो.. नाहीतर काही ठिकाणी तु किती जेवणार ??.. दोन पोळ्या खाणार की एक खाणार हे असं विचारल्यावर माझं तर पोटच भरतं.. तिळगुळाच्या जागी साखरफुटाणे देउन गोड बोला ही अपेक्षा आणि सारस्वतांच्या घरात तिळगुळ घ्या आणि जेवायला बसा असा थाट..
चहा कॉफीही न पाजणारी मंडळी दुसऱ्याने जेवायला बोलावलं की हात हलवत जाणार आणि तुडुंब जेउन येणार आणि घरी गेल्यावर छोटा लाडु आहे देउ का ?? असं विचारल्यावर मी म्हणते माझं डाएट आहे कारण मनात नसताना दिलेला लाडु मला तरी पचणार नाही.. दोनच मित्र , दोनच नातेवाईक, २४ तास दारंखिडक्या लावुन २४ तास घरात बसणारी मंडळी पाहुन वाटतं हे का जगत असतील ??.. कोणाशी न बोलता , कोणाला घरी न बोलवता ही माणसे जीवंत कशी राहु शकतात.. माझ्या माहेरचे दार सतत उघडं असतं.. आओ जाओ घर तुम्हारा.. पुण्यात माझ्या घरीही सेम.. पण सारस्वती थाटच वेगळा वाटीत किवा पेल्यात यांना माहीतच नाही डायरेक्ट ताटातच सगळं.. मोजकच बोलणं , मोजकच खाणं आम्हाला कधी जमलच नाही .. माझ्याकडे पुण्यातही जेवणाच्या वेळी आलेला माणूस न जेवता जात नाही .. नाहीतर जेउन आलीस का किवा आलेले पाहुणे गेल्यावर जेउ अशीच मंडळी दिसतात..
काळ्या वाटाण्याची आमटी , आंबट बटाटा भाजी , फणसाची भाजी , सांदण , कुळथाचं पिठलं, माश्याचं कालवण , मासे आणि सारस्वत हेच गणित असे अनेक टेस्टी पदार्थ खावेत तर फक्त सारस्वतांकडेच.. अनेक केटरर्स हे सारस्वत आहेत.. अगदी माझ्या नात्यात जवळपास शंभर च्या आसपास मंडळी ही केटरींग बिझनेस मधे आहेत.. जवळपास सगळे नातेवाईक पुरूष हे स्वतः घरातील कामे आणि स्वयंपाक करतात.. स्त्री पुरूष समानता दिसेल तर ती सारस्वतांकडे .. आयुष्यात एक तरी सारस्वत मित्र जोडा आणि फरक पहा..
जाती धर्मावरुन माणूस चांगला की वाईट ठरत नाही पण सारस्वताकडील मुलगी सुन म्हणुन तुमच्या घरात असेल तर फरक नक्कीच लक्षात येइल.. लग्नानंतर सारस्वत लोकांशी तसा फार संबंध राहिला नाही पण जेव्हा जेव्हा मी माहेरी जाते किवा नात्यात कोणाला भेटते तेव्हा हा फरक प्रकर्षाने जाणवतो.. आताही ४ दिवस माझी कझीन रोज डबा देतेय तिच्या हातचं खाताना हा बदल जाणवतो.. येणारे पाहुणे आपुलकीने चौकशी करताना हा फरक दिसतो.. कोकणी माणूस हा नारळ आणि फणसासारखा कसा हे इथे आले की कळतं.. माणुसकी हीच जात आणि धर्म मानणारी मी आणि कृष्ण भक्त आहे तरीही विचारसरणी , वागणूक , माणुसकी या सगळ्यात मोठा फरक हा दिसतोच..
सोनल गोडबोले.. ( तेंडुलकर )