हळदी कुंकूच्या कार्यक्रमाची गरज – शिवकांता पळसकर यांचे आवाहन

कंधार ( प्रा भगवान आमलापुरे ) आज सर्वांना घरांच्या सोबत गाड्या आणि बंगले होत आहेत. पण अश्या कार्यक्रमातून एकत्र यायला मिळते. ते गरजेचे आहे. असे प्रतिपादन विमा सल्लागार सौ शिवकांता आनंदराव पळसकर यांनी केले.
येथून जवळच असलेल्या फुलवळमध्ये सौ जयश्री आईनाथराव डांगे यांनी आम्ही वर्गमित्र बँच 1992 – 93 या व्हाट्सएप ग्रुपच्या सर्व सदस्यांसाठी रविवार दि 28 जाने 24 रोजी आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू च्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आता पेंशनचे असे तसेच आहे. पण एल आय सी कडे पेंशन सारखे भरपूर प्लँन आहेत. त्या योजनांचा लाभ घ्यावा. विशेष म्हणजे जुनी आणि बंद पडलेली विमा पाँलीशी जरूर चालू करून घ्यावी. त्यासाठी मी सर्व मदत करायला तयार आहे. असे आवाहन त्यांनी शेवटी केले. यावेळी सर्व स्थानिक वर्गमित्रांसोबत बाहेर गावातील श्री संजय भोसीकर, नायब तहसिलदार, तहसील कार्यालय लोहा, राजेश्वर मंगनाळे, प्रविण राठोड, डॉ कासीम बिच्चू , विठ्ठल पवार रब्बाणी शेख आणि शिवाजीराव श्रीमंगले याची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी कैलासराव डांगे, दिगांबर मंगनाळे ,माधवराव सोमासे आणि नवनाथ जेलेवाड यांनी अथक परिश्रम घेतले.प्रास्ताविक विजयकुमार सादलापुरे यांनी तर आभार आईनाथराव डांगे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *