ते अमर हुतात्मे झाले.’* हुतात्मा दिन 30 जानेवारी

 

 

जहालमतवादी युगाचा अंत होऊन 1920 मध्ये गांधी युगाच्या उदयाने नव्या युगाची सुरुवात झाली,
राष्ट्रीय आंदोलन सर्व देशभरात पोहोचवून ते जनआंदोलन देशव्यापी बनविण्याची आवश्यकता होती ,म्हणून
काळाची पावले ओळखून कणखर नेतृत्व देण्यासाठी व नवीन अनोखे तंत्र घेऊन भारतीय रंगमंचावर महात्मा गांधीचा प्रवेश झाला,आधुनिक भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत व उभारणीच्या इतिहासात जे कृतिशील चिंतक होऊन गेले त्यात महात्मा गांधी सर्वोच्च स्थानावर आहेत, आपल्या सत्य,अहिंसा व सत्याग्रह या त्रिसूत्रीतून संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्या कार्यकर्तुत्वाकडे वेधले गेले. खेड्याकडे चला म्हणून खेड्याचे महत्त्व विशद केले.

इंग्रजांना सळो की पळो करून सोडले,पश्चिमात्य विचारवंत टॉलेस्टाय, रस्किन यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता, न्या.गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे राजकीय गुरु होते, त्यांनी
,अस्पृश्यता निवारण, दारूबंदी, राष्ट्रीय एकात्मता, स्त्री पुरुष समानता ,हे विषय आपल्या हाती घेतले, सत्याची बाजू घेतली, दांडी यात्रा काढून मिठाचा सत्याग्रह केला ,जंगल सत्याग्रह केले, *करू किंवा मरू* हा महामंत्र देऊन या देशाची एकात्मता, स्वाभिमान, आत्मभान जागृत केला, तेव्हा भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्याची फळे आज आपण चाखत आहोत, त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटनांचा आपण येथे लेखाजोखा घेणार आहोत त्यासाठी हा शब्द प्रपंच…….

 

राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. त्यांचे राजकोट येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते परदेशात गेले. भारतातील काही लोक आफ्रिकेमध्ये शिक्षणासाठी राहत होते. तेथे काळे- गोरे हा भेदभाव केला जात होता, तेथूनच त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली, दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रवास करते वेळेस त्यांना गोऱ्या लोकांनी रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले, हेच सामाजिक विषमता त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला.
अस्पृश्यता नष्ट झालीच पाहिजे म्हणून त्यांनी कार्य हाती घेतले, त्यातूनच त्यांनी हरिजन हा शब्द
उच्चारले ,आपण सर्व परमेश्वराची लेकरे आहोत असे ते म्हणत,आपण सर्वजण समानतेने वागलो तरच आपला देश बलाढ्य होईल,

असे त्यांचे मत होते,
सर्वांना एकत्रित आणण्यासाठी त्यांनी
*रघुपति राघव राजा राम*
*पतित पावन सिता राम*
*ईश्वर अल्लाह तेरो नाम*
*सबको सन्मती दे भगवान*
असे म्हणून हिंदू- मुस्लिम एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केले,
दक्षिण आफ्रिकेतील शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर गुजरात मधील खेडा सत्याग्रह, चंपारण्य सत्याग्रह, अहमदाबादचा कामगार लढा यशस्वी केला ही गोष्ट त्या काळात करणे सोपे नव्हती, तो पारतंत्र्याचा काळ होता. एक व्यक्ती पारतंत्र्यांमध्ये भारत देश असताना असे मोठे मोठे कार्य करू शकतो, ही वाखण्याजोगी गोष्ट आहे. एक ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. आणि जहाल मतवादी युग संपले या देशाची सर्व सूत्रे महात्मा गांधीजींनी 1920 पासून आपल्या हातात घेतली त्यामुळे तेथून गांधीयुग सुरू झाले या देशातील लोकांवर होणारा अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी त्यांनी असहकार चळवळ सुरू केली, इंग्रजांना भारतातून हाकलून लावायचे असेल तर त्यांना असहकार केला पाहिजे असे त्याचे ठाम मत होते, ते अहिंसावादी होते, हिंसा न करता कार्य करून आपल्या मागण्या पूर्ण करावे असे ते मानवतावादी राजनीतीज्ञ होते ,

 

म्हणून त्यांनी असहकार सुरू केले ही चळवळ दोन वर्षे चालली, नंतर उत्तर प्रदेशातील गोरखपुर जिल्ह्यात चौरी चौरा या ठिकाणी हिंसा झाल्यामुळे ती चळवळ ताबडतोब थांबविण्यात आली आणि त्यांनी नंतर खिलाफत चळवळ सुरू केली, त्यामुळे लोक महात्मा गांधींच्या पाठीमागे खंबीर उभे राहिले, देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर आपण सर्वांनी एकत्रित आले पाहिजे असे ते म्हणत होते, त्यानंतर त्यांनी सविनय कायदेभंग हे चळवळ सुरू करून लोकांच्या मनामध्ये देशाविषयी प्रेम आपुलकी निर्माण केली, कायद्याचा भंग न करता केलेली लढाई म्हणजेच सविनय कायदेभंग होय, म्हणून त्यांनी लाखो लोकांना एकत्रित केले आणि हे सविनय कायदेभंगाचे कार्य सुरू ठेवले, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले , तिथे त्यांनी स्वातंत्र्याचा प्रश्न उभा केला
,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला ,राष्ट्रीय सभेच्या अकरा ठिकाणी निवडणुका झाल्या त्यात आठ ठिकाणी यश मिळाले,

 

अशाप्रकारे महात्मा गांधीजीच्या जीवनामध्ये चढ-उतार होतच होते या सर्व गोष्टी करणे म्हणावे तेवढे सोपे नव्हते, अगोदरच आपल्या देशात असणा-या अंधश्रद्धाळू,निरक्षर लोकांना एकत्रित करणे समजून सांगणे हे बोलायला जेवढं सोप आहे तेवढे प्रत्यक्ष कृती करायला सोपं नव्हते ,परदेशातील लोकांना भारताला स्वातंत्र्य मिळून द्यावे लागेल असे वाटत होते ,याच काळामध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले या सर्व गोष्टीचा विचार करून महात्मा गांधीजींनी चले जाव चे हत्यार आपल्या हाती घेतले, आणि इंग्रजांना छोडो भारत म्हणून ताठपणे उभे राहिले, दुसऱ्या महायुद्धात भारतावर लक्ष ठेवण्या साठी इंग्रजांची ताकद कमी झाली, नेताजी सुभाषचंद्र बोसने त्या काळात आझाद हिंद सेनेच्या द्वारे यशस्वी लढा दिला , क्रांतिकारक राजगुरू , भगतसिंग ,सुखदेव, चाफेकर बंधू,
रासबिहारी बोस ,कल्पना दत्त, विष्णू पिंगळे ,मदनलाल धिंग्रा, शिरीष कुमार मेहता ,अश्फाकउल्ला खान, चंद्रशेखर आझाद, अनेक शाळकरी मुली या सर्वांनी सशस्त्र क्रांतीतून इंग्रजांना चांगला धडा शिकवला, 1945 ला दुसरे महायुद्ध संपले , अनेक सैनिक मारल्या गेले, अर्थव्यवस्था कोलमडली त्यातूनच आपण सर्व एक झाल्या शिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही असे महात्मा गांधीजींनी लोकांना सांगितले आणि शेवटची घोषणा दिली, *करू किंवा मरू* यातून लोकांनी प्रेरणा घेऊन एकत्रित आले,
इंग्रजांच्या विरोधात घोषणा दिल्या. टेलिफोनच्या तारा तोडल्या. लहान- थोर सगळे एकत्रित झाले, 1942 चा लढा यशस्वी झाला, हिंदू- मुस्लिम एकत्रित आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, अनेक देशांना भेटी दिल्या

,त्यामुळे त्यांच्या कार्याला यश मिळत गेले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी दीडशे वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरी मध्ये खितपत पडलेला भारत स्वतंत्र झाला, या स्वातंत्र्याचे फळे आज आपण चाखत आहोत, ज्यांनी देशासाठी कार्य केले ते सर्व क्रांतिकारक यांचे विस्मरण होऊ नये. त्यांच्या स्मरण होणं महत्त्वाचे आहे अनेक लोकांनी या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले, घरावर तुळशी पत्र ठेवले, तेव्हाच आपल्या देशाला स्वतःचे सार्वभौमत्व मिळाले, महात्मा गांधीजींनी सत्य ,अहिंसा, सत्याग्रह याद्वारे कोट्यावधी लोक एकत्रित केले, या गालावर एखाद्याने मारल्यानंतर दुसऱ्या गालावर मारण्यासाठी तो गाल पुढे करा असे त्यांचे तत्त्वज्ञान होते, त्यांनी *माझे सत्याचे प्रयोग* हे आत्मचरित्र लिहून त्यांचे विचार जगासमोर ठेवले, अहोरात्र कष्ट ते या स्वातंत्र्या साठी केले , त्यांचे कार्य आपल्या भारतीयांसाठी सदैव प्रेरणादायी आहे, भारतातील त्या काळातील लोकांना समजून सांगून एकत्रित बसून शस्त्र हाती न घेता लढाई करणे म्हणावे तेवढे सोपे नव्हते, दांडी यात्रा काढून त्यांनी त्यांची शिस्त दाखवून दिली, साबरमती येथे आश्रम काढून सुतकताई केले,

आजच्या तरुणांनी त्यांचे संपूर्ण सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याचा अभ्यास करावा आणि नंतर त्यांच्याविषयी बोलावे ,
काही उठ- सूट महात्मा गांधीला नावे ठेवण्याचा प्रयत्न करतात, अगोदर आपण या देशासाठी काय केलं आहोत? याची यादी करावी, आपल्या घरातील लोक आपल्याला सांभाळता येतात का ? या वर सिंहावलोकन करावे तेव्हा त्यांचे कार्य आपोआप आपल्याला कळेल, हिंदुस्थानचे विभाजन होऊन भारत- पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले, स्वातंत्र्याचा आनंद सोहळा झाल्यानंतर काही मतभेद झाले आणि त्यातूनच 30 जानेवारी 1948 रोजी दिल्ली येथे ते हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले। ते अमर हुतात्मे झाले।. झगडली झुंजली जनता। मग स्वतंत्र झाली भारत माता।। हा संपूर्ण लेख त्यांच्या जीवन कार्याची माहिती देतो, आपण लगेच वादाचे मुद्दे घेऊन त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतो,
त्याने असे केले असते तर? तसे झाले असते? असे आपण चर्चा करतो ,
असे न करता ,आजच्या तरुणांने अगोदर आपले कार्य हाती घ्यावे,

लोक संघटित करावे ,आणि नंतर बोलावे, पहाडा सम ब्रिटिश सत्तेला अहिंसेतून धडक देताना, आणि कैद भोगताना, उपोषण करताना त्यांच्या देहाची अक्षरशः चाळणी झाली,आज त्यांना राष्ट्रपिता म्हणतात ,प्रत्येक नोटेवर त्यांची प्रतिमा आहे, याचाही थोडा विचार करून त्यांचे कार्य किती मोठे होते याचे चिंतन करावे असे मला वाटते, दिल्ली येथील प्रार्थना भवना मध्ये शुक्रवार 30 जानेवारी 1948 रोजी ते अमर हुतात्मे झाले हा दिवस हुतात्मा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्यांच्या समाधी स्थळाला राजघाट या नावाने ओळखले जाते अशा या महान समाजसुधारक, अहिंसावादी, मानवतावादी, राजनीतिज्ञ ,विभूतीला विठूमाऊली प्रतिष्ठानच्या वतीने विनम्र अभिवादन .

 

*शब्दांकन*
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष :विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता .मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *