नांदेड : प्रतिनिधी
दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’ निमित्ताने
“उत्सव मराठी भाषेचा,अभिमान मराठी भाषेचा”या उपक्रमांतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये लेखकांचा गौरव करण्यात आला.यावेळी माझ्या सामाजिक, साहित्य आणि शैक्षणिक योगदानाबद्दल लेखक म्हणून माझाही सत्कार संपन्न झाला आणि यावेळी मला व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली. यावेळी “ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक” या भितीपत्रकाचे विमोचन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठी भाषा विभाग प्रमुख आणि ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर सरांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद….
याप्रसंगी डॉ. वैजनाथ अनमुलवाड सर,प्रा. डॉ.पी.विठ्ठल सर, माझे साहित्य आणि शैक्षणिक चळवळीतील मार्गदर्शक शंकर वाडेवाले सर, माझे मित्र आणि ‘आता मव्ह काय’या आत्मचरित्राचे लेखक बंधूवर्य डॉ. देवीदास तारू सर,बाल साहित्यिक माधव चुकेवाड सर, कलावती घोडके मॅडम इत्यादी उपस्थित होती.