शब्दबिंब : हे राम
साबरमतीच्या महंताचा महिमा। राष्ट्रपिता आणि बापू नामे आहे ॥ मिठासाठीची पायी दांडी यात्राच। स्वातंत्र्याच्या आधि काढली आहे ॥ रघुपती राघव राजाराम हे भजन। मनाला समाधान करणारे आहे॥ अहिंसेने गोऱ्या इंग्रजाना पिटाळून। लावतांना स्वातंत्र्य मिळविले आहे॥ वर्णद्वेष हद्दपार करतांना अफ्रीकेत। काळे-गोरे वाद मिटविला आहे॥ खादी स्वदेशीचा पुरस्कार करतांना। विदेशीवर बहिष्कार घातला आहे॥ हर मागणी पदरात पाडून घेतांना । सत्याग्रहाचे हत्यारच उपसले आहे ॥ मोहनदास करमचंद गांधीजी हे नाव। स्वातंत्र्य लढ्यात अजरामर आहे ॥ तिन मर्कटांचे प्रसिद्ध बोलके शिल्प। सध्या मार्मिक संदेश देते आहे॥ कमरेस पंचा हाती काठी जाणवेधारी। उच्च विचारसरणी हे धन आहे॥ चरख्यावर सुत काततांना महात्मा। गांधी अहिंसेचा पुजारी आहे॥ वर्तमानी गांधीचे अडनाव राजकीय। स्वातंत्र्याचा खरा आत्मा आहे॥ गुजराती म. गांधीजी महाराष्ट्रात। वर्ध्याला आश्रम गांधीजींचा आहे॥ देहच चंदनातुल्य झिजवला म्हणुन । अजरामरच गांधींचे नाव आहे ॥ ३० जानेवारी १९४८ काळा दिवस। माझ्या भारतास बोचतो आहे ॥ २ ऑक्टोबर १८६९ साली जन्मून। ७९ वर्षाचे आयुष्य जगले आहे॥ स्वतःचे काम स्वतः करा हे ब्रीदच। तरुणाईच्या मनी बिंबवले आहे॥ गांधींनी टोपी कधीच घातली नाही। गांधी टोपी जगी प्रसिध्द आहे॥ ७६ वा हुतात्मा दिन साजरा होतांना । नतमस्तकच काव्य माझे आहे॥ म. गांधीजींचे हौतात्म्य सर्व जगताला। अजरामरच उर्जास्त्रोत आहे॥
गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा, ता. कंधार