नांदेड : शैक्षणिक, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीतील मार्गदर्शक आणि विद्यार्थी विकासासाठी, गुणवत्ता वाढीसाठी अत्यंत निष्ठापूर्वक काम करणारे एक उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी, संवेदनशील कवी व्यंकटेश चौधरी यांना नांदेड येथे दि.०४ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनात “भक्त नामदेव साहित्य पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे.
व्यंकटेश चौधरी हे गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमाने महाराष्ट्रात एक उपक्रमशील शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी आणि साहित्यिक म्हणून सुपरिचित आहेत. त्यांचे साहित्य चळवळीत मोठे योगदान असून एक प्रतिभावंत कवी, लेखक आणि साहित्यिक म्हणूनही त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय साहित्य संमेलन,विभागीय मराठी साहित्य संमेलनात आणि जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात सहभाग नोंदवून आपले योगदान दिले आहे.
साहित्य चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना ‘भक्त नामदेव साहित्य पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल चौधरी यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.