कंधार
कंधार तालुक्याचे भुमिपुत्र श्री सतिश सोपानराव यानभुरे हे खेड तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा जऊळके खुर्द शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वर्षभर शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्न केले आहेत. शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहे. शाळा लोकसहभागातून समृद्धीकडे नेण्यासाठी मुख्याध्यापक गणेश बैरागी ,पदवीधर शिक्षक संतोष हांडे. सहशिक्षक सिद्धार्थ ठोकळ यांच्या सोबत मोलाची भूमिका निभावली आहे. स्वतः लेखक असून त्यांचे धुळधान हा कथासंग्रह आणि जिवंत माझं दिसणं हि एकशे पस्तीस कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.
निखारे हा काव्यसंग्रह आणि आक्रांद ही कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांनी दोन गितांची निर्मीती करून आपला छंद जोपासला आहे. अशा वैविध्यपूर्ण कामगिरीमुळे श्री सतीश सोपानराव यानभुरे यांचा 2020 – 21 या शैक्षणिक वर्षातील कामगिरीसाठी खेड तालुक्याचे आमदार दिलीपअण्णा मोहिते पाटील , खेडचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले ,विस्तार अधिकारी जिवन कोकणे ,केंद्रप्रमुख दत्तात्रय गोसावी यांच्या हस्ते पंचायत समिती खेडमार्फत गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या सोबत त्यांच्या शाळेतील सहकारी श्री संतोष बापूराव हांडे यांंचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.