नांदेड : प्रतिनिधी
समाज कल्याण विभागातील सत्येंद्रआऊलवार साहेबांच्या नेतृत्वात जागतिक अपंग दिना निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , संदीप माळवदे यांच्या उपस्थितीत, समाज कल्याण अंतर्गत येणाऱ्या शाळेतील अपंग,अंध विद्यार्थ्यांच्या क्रीडा व लावणी महोत्सव स्पर्धा विषयी उत्कृष्ट असे मार्गदर्शन कुसुमताई प्राथमिक शाळेची कोमल बलभीम केंद्रे ने केले.
या आयोजित कार्यक्रमात त्या विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेत लावणीचे सादरीकरण केले.हे पाहून आलेले सर्व अधिकारी व समाज कल्याण विभागातील अधिकारी वर्ग खुश होऊन समाधान व्यक्त केले.अशा अंध आणि अपंग विद्यार्थ्यांना लावणी शिकवणे हे फार जिकरीचे काम आहे,हे कार्य खूप परिश्रम घेऊन कोमलने यशस्वी करून दाखवले, म्हणून आलेल्या सर्व अधिकारी साहेबांनी कोमलचे तोंड भरून कौतुक करून तिला गौरविण्यात आले.
हे गौरव पाहून आम्ही सर्व शिक्षकही आनंदी झालोत.या बाबत मी तिची चौकशी केली असता,तिने असे सांगितले, हे सर्व श्रेय माझ्या मावस बहिणीचे आहे.कारण हे मी तिचे अनुकरण करून शिकले आहे.असे ती स्पष्टपणे सांगितले.आणि एवढेच नव्हे तर गायन करणे,तबला व पेटी वाजवणे हे सुद्धा छंद जोपासते आहे,हे ही सांगितले.
आणि ती अभ्यासातही हुशार आहे.असे सुप्त गुण जोपासत नाव लौकिक व्हावे.हेच आमच्या शाळेतर्फे तिच्या भावी वाटचालीस खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा व अनेक शुभ आशीर्वाद!
लेखन : सांस्कृतिक विभाग प्रमुख, व्ही.डी.बिरादार सर*