नांदेड -लोहा मार्ग लातुर रेल्वे माझ्यामुळेच मंजूर, कोन्ही फुकटचे श्रेय लाटु नये – प्रा.मनोहर धोंडे

 

कंधार; प्रतिनिधी

लोहा कंधार मतदार संघाचा विकास करायचा असेल तर या तालुक्यातुन रेल्वे धावली पाहिजे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी रेल्वेसाठी गेल्या दहा वर्षांपासून लढा देत आहे.न्यायलायत जनहित याचिका दाखल करुन रेल्वे मंजुर करुन घेतली आहे.याचे प्राथमिक दोन वेळा सर्व्हे झाले असुन ६ फेब्रुवारी रोजी फायनल सर्वेक्षणाला दोन कोटी १७ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.नांदेड -सोनखेड-लोहा मार्ग लातुर रेल्वे मंजुर माझ्यामुळेच झाली आहे या रेल्वेचे फुकटचे श्रेय कोन्ही लाटु नये.रेल्वे मी मंजूर केली म्हणणाऱ्यांनी हिम्मत असेल तर पुरावे घेऊन या असे अहवान सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा.मनोहर धोंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

दिनांक १२ फेब्रुवारी रोजी कंधार येथील शिवालय संपर्क कार्यालयात प्रा.मनोहर धोंडे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.यावेळी माजी नगरसेवक अरुण बोधनकर,शुभम घोडके, हनुमंत घोडके,संदिप घोरबांड, प्रल्हाद पा.घोरबांड आदिंची उपस्थिती होती.यावे बोलताना प्रा.मनोहर धोंडे म्हणाले की, शिवसेनेत असताना नांदेड -सोनखेड मार्ग लातुर रेल्वे धावली पाहिजे यासाठी मी पहिला मोर्चा काढला होता.त्यानंतर मी न्यायालयात जनहित याचिका दाखल करून न्यायालयाला नांदेड -सोनखेड-लोहा मार्ग लातुर हा मार्ग रेल्वेसाठी कसा हिताचा आहे हे सविस्तर पटवुन दिले होते.यावर न्यायालयाने मनोहर धोंडे सांगतोय त्या पध्दतीने रेल्वे मार्गाचे सर्व्हे करा असे आदेश तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना दिले होते.त्यावळीच ही रेल्वे मंजुर झाली आहे.

सर्वेसाठीच दोन कोटी 59 लाख रुपये दिले. तेवढ्या पत्राचा आधार घेऊन 35 वर्षाची नांदेडकरांची प्रतिक्षा संपली. असे वक्तव्य करून जस काय उद्याच रेल्वे धावणार आहे. असा आव नांदेडचे खा.प्रताप चिखलीकरांनी केलेला आहे.

मी प्रताप चिखलीकरांना आपल्या माध्यमातून विचारू शकतो की, या रेल्वे मार्गासाठी खा.प्रताप चिखलीकर म्हणून आपले योगदान काय ? आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगेल की, मागच्या पाच वर्षात या नांदेड लातूर रेल्वे मार्गावर संसदेमध्ये भ्र शब्द सुध्दा काढला आहे का ? काढला असेल तर त्याचा पुरावा द्या. सध्या एक महिन्यावर लोकसभेच्या निवडणुका मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2024 च्या लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. म्हणून मताच्या झोळीसाठी जनतेची दिशाभूल करून मते झोळीत घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न खा.चिखलीकर यांनी केला आहे. त्यांनी जर या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केला असेल तर त्यांनी पुरावा द्यावा. मी ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाहीये मला माहिती आहे. तरीही माझ्याकडे नांदेड लोहा मार्गे लातूर रेल्वे मार्ग माझ्या प्रयत्नामुळे मंजूर झाला आहे. त्या संबंधाने सर्व कागदी पुरावे माझ्याकडे आहेत. मी केलेल्या पाठपुराव्याची संचिका मी जपून ठेवली आहे. यामध्ये प्रत्येक कागद हा मनोहर धोंडेच्या नावाचा आहे. प्रताप चिखलीकरांनी ही रेल्वे लाईन मंजूर केल्याचा एकही पुरावा जर दिला. तरी प्रताप चिखलीकरच्या घरी आयुष्यभर पाणी भरीन आणि जर नाही देऊ शकले तर खा. प्रताप चिखलीकरांनी माझ्या घरी पाणी भरावे. असा आरोप मनोहर धोंडे यांनी केला. जेव्हा 2009 ला मी विधानसभा निवडणूक लोहा मतदार संघातून शिवसेना-भाजपच्या वतीने लढवली. तेव्हा 2011 ला केंद्रीय रेल्वे विभागाला लेखी पत्र देऊन मागणी केली होती.

17 जानेवारी 2011 रोजी रेल्वे विभागाला पत्र दिले. कै.सुधाकरराव डोईफोडे व तत्कालिन खा.भास्करराव पाटील खतगांवकर यांनी नरसी, नायगाव मार्गे बिदर रेल्वे मार्ग करण्यात यावा. अशी मागणी केली होती. परंतु माझी मागणी ही मंजुर होणार नाही. अशी चर्चा देखील तत्कालिन काळामध्ये झाली. 8 फेुबु्रवारी रोजी शिवसेनेच्या वतीने लोहा तहसिलवर मोर्चा काढला. त्यानंतर 15 मार्च 2011 रोजी मा.उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद येथे जनहित याचिका दाखल केली. आणि त्या ठिकाणी माझ्या मागणीची पुर्तता झाल्याचे मा.न्यायालयाने सांगितले. तत्कालिन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2011 च्या आर्थिक वर्षात 111 रेल्वे नवीन मार्ग अस्तित्वात आणले. तेव्हा अनु.1 मध्ये या मार्गाचा उल्लेख होता. 16 नोव्हेंबर 2011 रोजी हा मार्ग मंजुर झाल्याचे सांगितले. तत्कालिन काळामध्ये मा.न्यायालय जनहित याचिकेसाठी 30 हजार रुपये भरणा करावा लागला. 2012-13 च्या आर्थिक वर्षात प्रथम पाहणीसाठी निधी मंजुर करण्यात आला.

 

त्यानंतर दुसरा पाहणी टप्पा म्हणून निधी मंजुर करण्याचे पत्र रेल्वे विभागाने काढले. असेच पत्र निवडणुका डोळयासमोर ठेवून तिसरा टप्पा म्हणून केवळ 2 कोटी 59 लाख रुपयांचे पत्र रेल्वे मंत्रालयाने काढले. 2 कोटी 59 लाख रुपयांच्या पत्रात उद्याच रेल्वे धावणार का ? असा अर्विहभाव खा.चिखलीकर यांनी जनतेला दाखवला. केवळ निवडणूकीसाठी असे पत्र रेल्वे विभागातून निघत आहेत. विकासकामे जनतेला भूलथापा देवून होत नाहीतर प्रत्यक्षात प्रयत्न करावे लागतात.आहे.खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी रेल्वे मंजुर केले असल्याचा एक जरी पुरावा दिला तरी मी त्यांच्या घरी पाणी भरेल,जर त्यांच्याकडे पुरावा नसेल तर त्यांनी माझ्या घरी पाणी भरावे असे खुले अहवान दिले आहे.नांदेड-सोनखेड-लोहा मार्ग लातुर रेल्वे माझ्या मुळेच मंजूर झाली असुन यांचे फुकटचे श्रेय खासदार प्रताप पा. चिखलीकर यांनी लाटु नये असा इशारा प्रा.मनोहर धोंडे यांनी पत्रकार परिषदेतुन दिला आहे.

 

चौकट
भारतीय निवडणूक आयोगाकडे सेवा जनशक्ती पार्टी या पक्षाची अधिकृत नोंदणी केली आहे.भविष्यात आमचा पक्ष महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात निवडणुका लढवणार आहे. महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुक लढवणार असुन भविष्यात आमच्या सोबत आघाडी किंवा युती करण्यासाठी दारे खुली आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात किमान दहा जागा लढवणार आहोत.लोहा कंधार -मतदार संघातून मी स्वतः सर्व ताकदीनिशी विधानसभा निवडणुकीत लढवणार असल्याची प्रतिक्रिया प्रा.मनोहर धोंडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *