आर.पी.आय. डेमोक्रॅटिक पक्षाला आ. मिटकरी यांचे अभिवचन*
#मुंबई_युगसाक्षी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण कार्यात वाघिवळीवाडा प्राचीन बौद्ध लेणी पुनर्वसन व मागासवर्गीय व बौद्धांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा प्रश्न हाऊस मध्ये मांडून प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन आमदार अमोल मिटकरी यांनी आर.पी.आय डेमोक्रॅटिक पक्षाला दिले. आमदार अमोल मिटकरी यांनी आर पी आय डेमोक्रॅटिक पक्षाच्या केंद्रीय कार्यालयास नुकतीच सदिच्छा भेट दिली.
यावेळी केंद्रीय महासचिव पँथर डॉ राजन माकनिकर, राज्य महासचिव पँथर श्रावण गायकवाड, आर.पी.आय डेमोक्रॅटिक बंजारा सेल राज्य प्रमुख शिवाभाई राठोड यांच्याशी राज्याच्या वाढत्या जातीय हिसाचाराबद्दल चर्चा केली. पीपीई किट, प्लास्टिक प्रदूषण, विजेचे व सोसायटी मेंटेनन्स शुल्क माफ करणे, महामानवांचे अवमान व विटंबना आदी प्रकरणी सविस्तर चर्चा करण्यात आली.
वाघिवलीवाडा ऐतिहासिक बौद्ध लेणी संदर्भात हाऊस मध्ये प्रश्न मांडून प्रकरण मार्गी लावण्याचे अभिवचन आ मिटकरी यांनी डॉ राजन माकनिकर यांना दिले.पक्षाचे राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्याशी भ्रमणध्वनी वर राजकीय समीकरण व राज्यातील विविध प्रश्नांवर बोलणे झाल्यानंतर पक्षाच्या वतीने पँथर श्रावण गायकवाड, शिवाभाई राठोड व डॉ माकनीकर यांनी निवेदन दिले.
आ. अमोल मिटकरी यांनी पँथर माकनिकर व गायकवाड यांच्या सामाजिक धोरणाच्या कार्याला सदिच्छा दिल्या असून भविष्यात समाज हितावह कार्यास सदैव साथ असल्याची ग्वाही दिली.