चळवळीतील जन सामन्याचा नेता- प्रा.रामचंद्र भरांडे


पद,प्रतिष्ठा,प्रसिद्धी आणि पैसा केलाच नाही कधी हव्यास-अँड.नितीन पोळ

सद्या गावोगावी आणि गल्लो गल्ली नेतेगिरीचे पीक आले समाजाचे प्रश्न ते सोडवणूक करण्यासाठी असलेले विचार त्यात नेतेगिरी डोक्यात घुसल्यावर मला पद त्यातून प्रसिद्धी प्रतिष्ठा,आणि एखादे राजकीय पद मिळाले पाहिजे व त्यातून प्रचंड पैसा मिळाला पाहिजे या विचार सारणीची अनेक नेते मला दहा पंधरा वर्षात भेटत गेली मात्र या सर्वांपासून वेगळे व्यक्तीमत्व अनुभवास मिळाले ज्यांनी कधीच पद, प्रसिद्धी प्रतिष्ठा व पैसा यांचा विचार  यांचा न करता प्रतिकूल परिस्थितीत सर्व सामान्य माणसाला सन्मान मिळावा म्हणून अहोरात्र परिश्रम घेत आहेत लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक मा प्रा रामचंद्र भरांडे सर आज सरांचा वाढदिवस त्या निमित्ताने या अवलिया व्यक्तिमत्वास मनस्वी व मनापासून मनापर्यंत हार्दीक शुभेच्छा……

.नांदेड जिल्ह्यात सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेले रामचंद्र भरांडे यांना बालपणीच आईचे व नंतर वडिलांचे प्रेमाला मुकावे लागले त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ व संगोपन केले  मिळेल मात्र कोणत्याच परिस्थितीत हार न पत्करता यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे मिळेल ते काम करून शिक्षणाची कास धरली त्यातून समदु:खी व समविचारी माणसं भेटत गेली शिक्षण घेत असताना मातंग समाजाचे जेष्ठ नेते व्ही जी रेड्डी ,जी एस कांबळे यांचा सहवास लाभला प्रसंगी सायकल तर कधी पायी व मिळेल त्या साधनाने  गावोगावी मातंग वस्तीत जाऊन समस्या समजावून घेतल्या शिक्षण हेच तुमच्या समस्येवर जालीम औषध आहे .

त्या करिता प्रबोधन केलेआपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हक्काचे संघटन असले पाहिजे म्हणून लोक स्वराज्य आंदोलनाची निर्मिती करून समाजावरील अनेक अन्याय अत्याचार व सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली त्या साठी प्रचंड मेहनत विषयाचा व्यासंग व त्याची सोडवणूक करण्यासाठी नुसते लोक सोबत असून चालत नाहीत.

 औरंगाबाद विद्यापीठ परिसरात शिक्षण घेत असताना अनेक शिक्षक, प्राध्यापक डॉक्टर,वकील इंजिनियर, सरकारी सेवेतील कर्मचारी यांना भेटून सामाजिक प्रश्नावर चर्चा करून मतमतांतरे जाणून घेऊन सामाजिक कार्यासाठी प्रेरित केले अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण या विषयावर अनेक परिषदा,चर्चा सत्र,  आंदोलने, निवेदने एवढेच काय पण  शंभर किलो मीटर अंतराच्या अनेक पदयात्रा काढून सर्व सामान्य जनते पर्यंत  आरक्षण वर्गीकरण हा विषय घेऊन गेले त्यास अनेक कार्यकर्ते व समाज बांधवांनी मोठे सहकार्य केले 

आरक्षण वर्गीकरण व्हावे या मागणी साठी अनेक जिल्हाधिकारी कार्यालया पासून मुबई चे विधान भवन,आझाद मैदान असो की नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चे नेले नागपूर हिवाळी अधिवेशनवर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण या मागणी साठी नेलेल्या मोर्चावर सरकार कडून लाठी चार्ज झाला अनेक लहू सैनिक जखमी झाले स्वतः रक्त बंबाळ झाले असताना आपल्या बहाद्दर सैनिकांची काळजी घेत सरांनी त्याना आधार देण्याचे काम केले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या या आंदोलनाने आरक्षण वर्गीकरणाची मागणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेली व सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या राजकीय व्यासपीठावर चर्चेचा विषय ठरलीत्यानंतर आरक्षण वर्गीकरणाची चळवळ व्यापक व्हावी म्हणून हजारो गोर गरीब समाज बांधवांनी आर्थिक मदत करून या नेत्यास नवीन गाडी भेट दिली .

खिशात एक रुपया नसताना हजारो किलो मीटर प्रवास आजही सुरू आहेआरक्षण वर्गीकरण करण्यात प्रस्थापित राजकीय काँग्रेस,राष्ट्रवादी भाजप असो की शिवसेना या पक्षांनी नेहमीच मातंग समाजाचा वापर करून घेतला ही गोष्ट लक्ष्यात आल्या नंतर मागील लोक सभा व विधान सभा निवडणुकीत आपले उपद्रव मूल्य दाखवल्या शिवाय आपल्या सामाजिक प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचे लक्ष जाणार नाही या तत्वाने अनेक कार्यकर्ते समाज बांधव यांच्याशी विचार विनिमय करून वंचित आघाडीच्या सोबत जाण्याचा पर्याय निवडला काही अंशी हा प्रयोग यशस्वी झाला काही अंशी फसला असला तरी त्या तुन सामाजिक प्रश्नाला गती मिळाली आहे .

प्रा रामचंद्र भरांडे
प्रा .रामचंद्र भरांडे

आजही स्वतःची लढाऊ अशी वेगळी ओळख जपत संघटनेच्या व सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी उभारलेला लढा तितक्याच ताकदीने सुरू आहे आणि सुरू राहील यात पद प्रतिष्ठा,पैसा या पेक्षाही सामाजिक प्रश्न सोडवण्याची प्रामाणिक तळमळ आणि प्रचंड मेहनत, विषयाचा व्यासंग,व तो सोडण्या ची तयारी निश्चित पणे या स्वाभिमानी नेत्याला आपल्या आशीर्वादाची व बळाची आवश्यकता आहे ती आपण सर्वांनी द्यावीच ही अपेक्षावाढ दिवसाच्या पुन्हा एकदा मंगलमय शुभेच्छा……

*अँड.नितीन पोळ*(प्रदेश अध्यक्ष)

लोक स्वराज्य आंदोलन

9860733420 \

9174894420

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *