मुखेड -अन्नदानापेक्षा ज्ञानदान महत्त्वाचे आहे. ज्ञानदान हे जीवनभर कामाला येते. आपण मुलांना जसे घडवु तसे ते घडत असतात. सोशल मीडियाचा चांगला वापर करा. मोबाईल चांगला आहे तसा वाईटही आहे. आपण त्याचा वापर कसा करतो त्यावरती अवलंबून आहे.आज आपण सेल्फी काढण्यातच दंग आहोत. गुगल आपण जसे मागणी करतो ते ते पुरवते.त्यामुळे चांगल्याची मागणी करा. दीपा मलिक, देवेंद्र झांजरिया या दिव्यांग आणि शारीरिक व्यंग्यावरती प्रबळ ईच्छा शक्तीने मात केली म्हणून ते जागतिक स्तरावर चमकु शकले.यासाठी सतत सकारात्मक विचार ठेवा.
मी सतत सकारात्मक राहीन असा ठाम निश्चय करा. कोणतेही काम करताना ते डोक्यात ठेवून करा.चांगले तेच घ्या, आत्मविश्वास मजबूत ठेवा. शिक्षणावर प्रेम करा.त्यांनी या वेळी बालपण ही कथा व एकपात्री अभिनय सादर केला.महापुरुष हे खऱ्या अर्थाने आपले रियल हिरो आहेत मोबाईलच्या रिल हिरो पेक्षा रियल हिरोंचा आदर्श घ्या असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री अनुपमा बन यांनी ग्रामीण (कला वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय, वसंतनगर ता.मुखेड येथे विद्यार्थी विकास समिती व सांस्कृतिक विभागाकडून आयोजित विद्यार्थी संसद उद्घाटन व स्नेहसंमेलन समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले
. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड म्हणाले की आम्ही आमच्यातल्या माजी गुणी विद्यार्थ्यांचासत्कार ही करत असतो.यावर्षी अशाच एका गुणी विद्यार्थिनी महानंदा केंद्रे यांचा सत्कार येथे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न केला आहे. स्नेहसंमेलन हे अतूच्च आनंदाचा क्षण असतो.तरुण पिढी आता अस्या संमेलनाची वाट पाहत नाहीत.ही चिंतेच्या बाब आहे. चांगले कलाकार यातून निर्माण होत असतात.येथे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करणार आहोत.ज्यांना पारितोषिक मिळाले नाहीत त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डाॅ.कविता लोहाळे यांनी केले. तर आभार प्रा.डॉ.नागोराव आवडे यांनी मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास समितीचे प्रमुख प्रा.डॉ.श्रीनिवास पवार यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका सविस्तर विशद केली. कार्यक्रमात स्नेहसंमेलनानिमित्ताने वक्तृत्व, रांगोळी,मेहंदी,आनंदनगरी,फॅन्सी ड्रेस स्पर्धा,नृत्य,गायन अस्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.त्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अल्पोहापाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास समितीचे प्रमुख प्रा.डॉ.श्रीनिवास पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ महेश पेंटेवार, या समितीच्या सदस्या प्रा.डाॅ. कविता लोहाळे, समितीचे सदस्य तथा स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ.नागोराव आवडे, समितीच्या सदस्या तथा रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.सौ. अरुणा ईटकापल्ले, समिती सदस्य तथा कार्यालयीन अधिक्षक रमेश गोकुळ आदींनी तथा विविध स्पर्धा संयोजक व त्याच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
सदरील कार्यक्रमात या वर्षीचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार महानंदा केंद्रे यांना देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सदरील कार्यक्रमास उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे,विद्यापीठ प्रतिनिधी कु.वर्षा घोणसे व विद्यार्थी संसद सचिव कु.कांचन केंद्रे,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.