माझी वाचक मोनिका पायगुडे जिचा गेल्या वर्षी मी महिलादिनानिमित्त सन्मान केला होता.. ती गेल्या वर्षी वकील झाली. धुणी भांडी करुन तिने हा पल्ला गाठला.. ती पैशाने गरीब होती पण विचाराने कायमच श्रीमंत .. सगळी पुस्तके घरी येउन तिने विकत घेतली.. गेल्या वर्षी सन्मान करताना तिला विचारलं साडी देउ का तुला ?? . तेव्हा तिने पुस्तके द्या मॅम असं सांगितले आणि कालच्या प्राउड टु बी अ ट्रांसवुमन या पुस्तक प्रकाशनाला तिने बॅक स्टेजला भरपुर मदत केली …
तुमच्या सहीने पुस्तक द्या मॅम मी पे करते आणि लगेच G pay केलं.. संपूर्ण पुस्तके तिच्या हातात होती तरीही त्या पुस्तकाना हात न लावता तिने तिचा प्रामाणिकपणा दाखवत पुस्तक विकत घेतले आणि म्हणाली , पुस्तक कधीही फुकट घ्यायचे नाही कारण एक पुस्तक लिहायला लेखक एक / दोन वर्षे काम करत असतो.. त्यासाठी तोही रेफरंससाठी अनेक पुस्तके विकत घेतो.. हिला गरीब कुठल्या ॲंगलने म्हणायचे.. सगळ्यात श्रीमंत माझी सुंदर वाचक मोनिका..
मिलिंद माझा मित्र ज्याने या पुस्तक प्रकाशनासाठी अनेक प्रकारची मदत केली. अगदी पाहुणे सुचवण्यापासुन ते त्यांना फोन मेसेजेस करणे असेल आणि कार्यक्रमाच्या वेळी फेसबुकलाइव्ह ला २ तास मोबाईल हातात धरणे असेल आणि तरीही म्हणतो मी काहीच केलं नाही.. त्याहीपुढे जाऊन जेव्हा त्याला मी पुस्तक गिफ्ट दिलं तेव्हा त्याने त्याचे पैसे दिलेआणि म्हणाला , पुस्तक फुकट घेणार नाही.. दुसरे काही असते तर घेतले असते..
माझा अजून एक सुनील नावाचा मित्र प्रकाशनाच्या दिवशी त्याने ५ पुस्तके घेतली आणि आज रोटरीच्या एका कार्यक्रमासाठी रीटर्न गिफ्ट म्हणुन द्यायला पुन्हा ४० पुस्तकांची ऑर्डर दिली.. प्रत्येक पुस्तकाच्या तो किमान १० प्रती दरवेळी घेतो आणि प्रकाशन सोहळा संपल्यावर म्हणाला , श्रम परिहार म्हणुन रविवारी ब्रेकफास्ट ला जाऊ..
बॅक ऑफ महाराष्ट्रातुन रिटायर झालेले विवेक सर प्रत्येक पुस्तक प्रकाशनानंतर १० copies चे पैसे देतात आणि एक कॉपी घेउन जातात..
बियॉन्ड सेक्सची किमत १४० रुपये आहे पण विवेक नावाच्या एका मित्राने त्याचे ५००० रुपये दिले होते.. आणि म्हणाला , १४० ही प्रींटींग कॉस्ट आहे सोनल .. तुझ्या शब्दांची किम्मत आम्ही करु शकत नाही..
फॅंटसीज ॲंड ब्युटीज इन सेक्स या कादंबरीचा प्रकाशन खर्च मंदार ने केला होता.. अगदी पाहुण्यांपासुन सगळं त्याने केलं होतं..
माझा मित्र जयंत दलाल याने तर माझ्या आर्टीकल्सवर इंद्रधनु हे पुस्तकच छापून दिले आणि आता त्याचा पुढील भाग येतोय..
मी नेहमी माझ्या मित्रांचं कौतुक का करते ते यावरून तुमच्या लक्षात येइल.. इतकच नाही तर फिरायला नेणं असेल , फोटो रील्स करणं, खरेदी असेल या सगळ्यासाठी ते सदैव तत्पर असतात .. तरीही मी रुसते पण प्रेमही करते.जी रुसत नाही ती मैत्रीण कसली ना.. घरी सचिनवर मात्र कधीही रुसत किवा रागवत नाही..
काय पुण्य असावं ना.. एक व्यक्ती मोठी होताना अनेक मंडळी तिच्या भोवती असतात .. माझ्या कडे तर अखंड मित्रांचा ताफा आहे.. कुठल्याही अपेक्षा नाहीत.. फक्त प्रेम आणि सोनल ला पुढे जाताना पाहून होणारा आनंद अजुन काहीच नाही.
फक्त कृतज्ञता आणि प्रेम इतकच मी देउ शकते..
Love you Alll
सोनल गोडबोले