छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र छावा श्रमिक संघटना व जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांना नांदेड भूषण डॉ. हंसराज वैद्य यांच्या हस्ते ” शिवरत्न पुरस्कार ” देऊन गौरव करण्यात आला असून ठाकूर यांच्या पुरस्कारांची संख्या ८८ झाल्यामुळे सर्व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सोमवारी वैद्य हॉस्पिटल समोर भास्करराव हंबर्डे व प्रा. ममता पाटील यांनी शिवजन्मोत्सव २०२४ चे आयोजन केले होते. यावेळी काळेश्वर देवस्थानचे सचिव शंकरराव हंबर्डे, अवतारसिंघ सोडी, भाजपा सरचिटणीस दिलीपसिंघ सोडी, मंडल अध्यक्ष अंबादास जोशी, अन्नपूर्णा माता मंदिराच्या अध्यक्षा सुषमा गहेरवार, पूजा बिसेन, सुनिता चव्हाण , अमित मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिलीप ठाकूर यांना “शिवरत्न पुरस्कार “देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी प्रास्ताविक करताना भास्कर हंबर्डे यांनी असे सांगितले की, समाजातील गोरगरीब, अनाथ, वेडसर, लोकांसाठी भाऊंचा डबा, चरणसेवा, मायेची उब, कायापालट, सेवा ही संघटन, भाऊचा माणुसकीचा फ्रिज, कृपाछत्र, उन्हाळ्यात पानपोई, रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम आदी सामाजिक उपक्रम दिलीप ठाकूर हे नियमित राबवितात. याशिवाय नरेंद्र देवेंद्र महोत्सव, बहना भाग मत जाना, अमरनाथ यात्रा, गोदावरी गंगापूजन, मोठ्या पडद्यावर क्रिकेट स्पर्धा दाखवणे, राष्ट्रभक्तीपर चित्रपट मोफत दाखवणे, आदी उपक्रमांचा समावेश आहे.वर्षभरातील जगावेगळे ८५ उपक्रम राबविणार्या दिलीप ठाकूर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र रत्न, मराठवाडा भूषण, कर्मयोगी, दीनबंधू सेवा पुरस्कार, नांदेड के सांता, शान ए नांदेड, इन्स्पायर पर्सनालीटी, आदर्श शिवसैनिक पुरस्कार, राजपूत भूषण पुरस्कार, माँ जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार, राजे छत्रपती शिवाजी सेवाभाई पुरस्कार, मातोश्री गंगूताई पुरस्कार, जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय कृपा पुरस्कार, तिरंगा गौरव पुरस्कार, लॉयन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवार्ड, कृतज्ञता सेवेचा पुरस्कार, राजरत्न पुरस्कार, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता,मराठी अपडेट कृतज्ञता पुरस्कार,फिनिक्स ह्युमॅनिटी नॅशनल अवॉर्ड, भक्त नामदेव अखंड सेवावृत्ती पुरस्कार मिळालेले आहेत. कोरोना लॉकडाउनच्या काळातील केलेल्या कामाची दखल घेऊन २२ संस्थांनी कोरोना योद्धा हा पुरस्कार देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे यातील १६ संस्था मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्र बाहेरच्या आहेत. सातत्याने उपेक्षित घटकांसाठी सेवा कार्यात आयुष्य खर्च करणारे
दिलीप ठाकूर यांना मिळालेल्या पुरस्काराची संख्या ८८ झाल्यामुळे अनेकांनी अभिनंदन केले आहे.