‘जीव सये मी गं तुला लावलाय बाई… पापनीत झाली कशी काजळाला घाई…!!’

 

महात्मा फुले महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी शंकर वाडेवाले यांची मंत्रमुग्ध करणारी काव्य मैफिल …!
———————————

अहमदपूर, (प्रतिनिधी)
येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी
_’जीव सये मी गं तुला लावलाय_ बाई…!
_पापनीत झाली कशी काजळाला_घाई_…!!
_सपनात रोज तुझे_
_डाळिंबी गं व्हट_!
_गालावरून_ हळू फिरे__
_चावट ही बट_!!’
या सारख्या एकापेक्षा एक सरस आणि सुरेल अशा सौंदर्यपूर्ण ग्रामीण जाणिवेच्या कविता नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक कवी शंकर वाडेवाले यांनी सादर करून स्नेह संमेलनाच्या काव्य मैफिलीचा रंगात गडदता आणली.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनाचा उद्घाटन सोहळा महाविद्यालयाच्या महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी शंकर वाडेवाले यांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी आपल्या एकसे बढकर एक बहारदार कवितांचे सादरीकरण करून संमेलनात चांगलीच रंगत भरली. याप्रसंगी आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना शंकर वाडेवाले म्हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे जीवन समजून घेतले पाहिजे. एवढेच नव्हे तर त्यांचे कष्टमय जीवन बदलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठाही केली पाहिजे. शेतकरी जगला तरच देश जगेल हे सर्वांनी लक्षात घ्यावी असेही ते यावेळी म्हणाले.

या प्रसंगी त्यांनी आपली. ‘मालदांडी’ या कवितेसह एकापेक्षा एक अनेक सरस व सुरेल कविता सादर केल्या. यावेळी आपली ”मालन’ ही कविता सादर करताना कवी शंकर वाडेवाले म्हणाले की –
_तुझ्या डोळ्याची गं भाषा घेई_ _काळजाचा ठाव…!_
_पापणीच्या काठावर कोरलेल़ं तुझं_ __नाव…!!_
यावेळी फुले मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, स्नेहसंमेलन प्रभारी ह.भ.प. प्रो. डॉ. अनिल महाराज मुंढे, सह प्रभारी डॉ. सतीश ससाणे, विद्यार्थी प्रतिनिधी कु. वैष्णवी मुंढे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ललित लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या व महात्मा फुले महाविद्यालयाच्या गौरवशाली गुणवत्तेच्या परंपरेचा उल्लेख करून महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा, समाजसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रातली घोडदौड नमूद केरून यापुढेही अग्रेसर रहावे असे आवाहन केले.

वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरणही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या दिमाखदार उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक स्नेहसंमेलनाचे प्रभारी प्राध्यापक ह.भ.प. डॉ.प्रो.अनिल महाराज मुंढे यांनी केले.तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *