प्रसिद्ध चित्रकार विजयसिंह ठाकूर यांनी काढलेल्या ६० अप्रतिम विजय अविष्कार कॅनव्हास पेंटींगचे 29 रोजी प्रदर्शन

 

*प्रसिद्ध चित्रकार विजयसिंह ठाकूर यांनी काढलेल्या ६० अप्रतिम विजय अविष्कार कॅनव्हास पेंटींग प्रदर्शनाचे गुरुवार दि. २९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता रोहीत हॉटेल सभागृह, श्रीनगर नांदेड येथे खा. प्रतापराव चिखलीकर यांच्चा हस्ते उद्‌घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.डॉ. अजीत गोपछडे उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.*

कला शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या विजयसिंह ठाकूर यांनी अनेक उत्तम चित्रांची निर्मिती केली आहे.३३ वर्षाची प्रदीर्घ सेवा झाल्यानंतर सेवानिवृत्ती चे औचित्य साधून हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे , पोतदार कॉलेजचे संचालक प्रा. चंद्रकांत पोतदार तसेच चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र कांबळे हे उपस्थित राहणार आहेत.

 

आयोध्या येथील श्रीरामाची नवीन मूर्ती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्री गणराज ,श्री विठ्ठल, महात्मा गौतम बुद्ध यांच्या शांती मुद्रा अशा विविध ६० वैश्विक प्रतिभेची अमूल्य चित्राकृती प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.या अभिजात चित्राकृती पाहून च्या या सौंदर्य शालिनीची आठवण रसिक मनाला आल्याशिवाय राहत नाही.

 

ती सर्व कॅनव्हास पेंटिंग कला रसिकांना पाहण्यासाठी व विक्रीसाठी उद्घाटनानंतर २९ फेब्रुवारी व एक मार्च रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात आली आहे. तरी नांदेडवासियांनी या प्रदर्शनाला आवश्य भेट द्यावी असे आवाहन भोकरदन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रघुवीरसिंह चंदेल, अर्जुनसिंह ठाकूर,जगदीशसिंह ठाकूर, महेंद्रसिंह ठाकूर यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *