पंतप्रधान मोदींशी अशोकरावांचे हितगूज राजकीय परिस्थिती व निवडणूक तयारीवर चर्चा

 

नांदेड, दि. ४ मार्च २०२४:

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नवनिर्वाचित राज्यसभा खासदार अशोकराव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हितगूज साधून नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व निवडणूक तयारीवर चर्चा केली आहे.

पाच राज्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आदिलाबादहून नांदेडमार्गे चेन्नईला जात असताना सुमारे १५ मिनिटे नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर थांबले होते. यावेळी जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यामध्ये नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या अशोकराव चव्हाणांचाही समावेश होता. स्वागत स्वीकारताना पंतप्रधानांनी काही मिनिटे थांबून चव्हाणांशी छोटेखानी संवाद साधला. यावेळी उभय नेत्यांनी एकमेकांचा हात हातात घेतलेले एक छायाचित्र दुपारनंतर सोशल मीडियावर वेगाने फिरले.

विमानतळावरून बाहेर पडताना चव्हाणांनी या भेटीबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने मला राज्यसभेची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानले. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्याचे वर्तमान राजकीय चित्र आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा झाली. मी लवकरच त्यांना पुन्हा भेटणार असल्याचे सूतोवाचही अशोकराव चव्हाण यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *