नांदेड – दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.8 मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त तरोडा बु.येथील लक्ष्मीनारायणनगर येथे महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त भजनसंध्याचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती संयोजक संतोष पांडागळे यांनी आज येथे दिली.
मागील पाच वर्षांपासून तरोडा बु.येथील लक्ष्मीनारायणनगर येथे महाशिवरात्रीनिमित्त भजनसंध्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. गतवर्षी उकेश शिखवाल यांच्या भजनसंध्याने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. यावर्षी नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिध्द अशा सालासार भजनी मंडळाचा कार्यक्रम दि.8 मार्च रोजी सायंकाळी 8 वाजता आयोजित केला आहे.
भजनसंध्या सोहळ्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, विधान परिषदेचे माजी प्रतोद अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ.मोहनअण्णा हंबर्डे, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, माजी सभापती किशोर स्वामी, भाजपाचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपाचे माजी महानगराध्यक्ष प्रविण साले, प्रदेश प्रतिनिधी ॲड.चैतन्यबापू देशमुख, विजय येवनकर, ॲड.निलेश पावडे, माजी सभापती संजय बेळगे,माजी महापौर सतीश देशमुख, माजी नगरसेविका सौ. संगीता तुप्पेकर, सौ.कविता मुळे, कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजी पांडागळे, माजी नगराध्यक्ष सुनिल शेट्टे, उद्योजक सुमित मोरगे, मारोती कंठेवाड, नवल गुप्ता आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
तरी या कार्यक्रमास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ॲड.अरूण मोरे, संतोष सूर्यवंशी, श्रीनिवास बंकलवाड, आदित्य बकवाड, शिवा पाटील, अभिजित ढोके, सावन बेलकर, अभिजित दुडके, राहुल घुमाडे, शैलेश देशमुख, आकाश इंगळे, सुमेश वाघमारे, प्रणव ठाकूर, गणेश गंगोत्री, प्रविण मोरे, रोहित देशमुख, प्रथमेश देशमुख, अक्षय पावडे, आशिष वारले, स्वप्नील वसमतकर, सुमित जवादवार, सौरभ देवकत्ते, आकाश कुरेवाड, रंजीत ढोले, श्रीराज पाराशर, सुदर्शन घुगे, सत्यम संगनवार, मनोज एंडरगे, गणेश एंडरगे, कृष्णा सोनटक्के, प्रणव तांदूलवाड, आशुतोष माडगे, सुजित भोजराज, विशाल वाघमारे, विशाल काळे, शिवम येवरे, कैलास मुधळे, सुहास साखरे, महेश बिराजदार, साईनाथ जाधव, योगेश नागला, रवि दासरवाड, संगम आगलावे, युवराज शेंबाळे, महेश गौंड, वैभाव वाघे, आकाश सोनारीकर, साई पांचाळ, शिवम बोरकर, योगेश सगर, ऋषिकेश बोरकर, संदेश वाघ, वेदांत पांडे, विजय दुट्टे, जय दुट्टे, नितीन येवते, संदेश कदम, देवेंद्र पौळकर, सोनु आडे यांनी केले आहे.