महिला दिन.. भाग ३… Single parent Mother..

 

 

हा विषय दिलाय माझे वाचक गणेश ओगले यांनी, त्यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते .
माझी वंदना नावाची मैत्रीण गेली अनेक वर्षे सिंगल पेरेंट आहे तिनेही हा विषय लिहायला सांगितला त्यामुळे तिचीही मी कृतज्ञता व्यक्त करते.
आपलं लग्न कोणासोबत व्हावं.. ते किती टिकावं .. हे सगळं आपल्या आधीच्या कर्मानुसार ठरलेलं असतं यात आपल्याला बदल करता येत नाही. फक्त लग्नच नाही तर वैवाहिक आयुष्य कसं असावं किवा पैसा , संपत्ती , व्यवसाय , नोकरी म्हणजेच आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही विधीलिखीत म्हणजेच आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळते आणि हे शास्त्रात सांगितले आहे .. कर्माचा सिध्दांत हे पुस्तक जरुर वाचा..
पण आता या क्षणाला आपण कसे वागतो हे आपल्याच हातात आहे असं मला वाटतं.. उदाहरण द्यायचे झाले तर अनेक स्त्रीयांना पटकन राग येतो , कुठल्याही गोष्टी ऐकुन न घेता त्या पटकन रीॲक्ट होतात , नात्यात एक घाव दोन तुकडे करुन उपयोग नाही तर तिथे सयम हवा.. काही गोष्टी सहन करता यायला हव्यात आणि काही वेळा तोंड उघडताही यायला हवे.. ती योग्य वेळ कुठली हे ओळखायला आपल्याला चांगल्या विचारांची गरज असते त्यामुळे बऱ्याचदा नाती बिघडतात आणि घटस्फोट होतात.. पदरात मुल घेउन स्त्री घराबाहेर पडते आणि तिची कुतरओढ सुरु होते.. कधी व्यसनान्मुळे तिला मारहाण होते किवा वाईट सवयीमुळे त्याचा मृत्यू होतो आणि ती विधवा होते .. एक अनुभव वाईट असतो म्हणुन पुन्हा लग्न न करता ती एकटीने मुलं वाढवण्याचा निर्णय घेते.. अशावेळी कधीकधी तिला आईवडील मदत करतात , काहीवेळा तिचं तिला नोकरी करुन मुलांना सांभाळावं लागतं..याचे खुप वेगवेगळे पैलु असतात.. एका लेखात सगळं लिहीणं खूपच अवघड आहे .. प्रत्येक व्यक्तीगणिक आणि त्यांच्या कर्मानुसार या घटना घडतात म्हणुन आता आपण चांगले वागणे गरजेचे आहे आणि तितकच ते आपल्या हातातही आहे.(. भगवद्गीतेचा १८ वा अध्याय ६६ वा श्लोक यात श्रीकृष्ण सांगतात , सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करुन मलाच शरण ये . मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन . तु भयभीत होवु नकोस.. त्यासाठी भगवंतावर विश्वास हवा आणि रोज हरीनाम घ्यायला हवे..)
विधवा , घटस्फोटीत स्त्रीकडे पुरूष सहानुभूती म्हणुन पहातो आणि बऱ्याचदा अशा स्त्रीचा , तिच्या आर्थिक , मानसिक कमतरतेचा पुरूष फायदा घेतो .. अशावेळी नोकरी नसलेली स्त्री अनेक नको असलेल्या गोष्टी करुन पैसा मिळवते आणि त्या चक्रात ती अडकली जाते.. मित्र म्हणुन जवळ येणारा प्रत्येक पुरूष हा तिच्याकडे उपभोगाची वस्तु म्हणुन पहातो , कधी नात्यातील पुरूषही तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतात , कधी पैशाचे आमीष दाखवले जाते तर कधी प्रेम हा पवित्र शब्द वापरुन तिच्या भावनांचा अनादर केला जातो म्हणुन स्त्रीने शिक्षण घेउन स्वतःच्या पायावर उभे असावे पण पुरुषांच्या वरचढ होण्यासाठी तिने या मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करु नये.. तिच्या आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी शिक्षण , स्वातंत्र्य याचा उपयोग करावा.. पूर्वी घटस्फोटीत किवा विधवा या शारीरिक सुखासाठी किवा मानसिक आधारासाठी कुढत रहायच्या पण आता शहरात ही परिस्थिती बदलत आहे पण खेड्यात आजही त्यांच्या पुनर्विवाहाचा विचार करण्याची मुभा तिला नाही याचं वाईट वाटतं..
अनेक विवाह संस्था विधवा किवा घटस्फोटीत महिलांचे विवाह लावतात मेट्रो सिटीमधे काही मुलही आईचे पुन्हा लग्न लावुन द्यायला लागले आहेत.. एक पुरूष असा होता म्हणजे दुसरा तसाच असेल हा विचार स्त्रीने बाजूला ठेवावा आणि पुन्हा नव्याने संसाराकडे वळावे कारण शारीरिक आणि मानसिक गरजा या प्रत्येकाला असतात आणि त्या गरजांसाठी आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची गरज लागतेच.. बऱ्याचदा मुलं आईला म्हणतात , तुच आमचा बाबा आणि तुच आई.. पण त्या स्त्रीला काय दिव्यातुन जावे लागते याचा विचार संपूर्ण कुटुंबाने करणे गरजेचे आहे.. तिलाही तिची बाजू ठामपणे मांडता यायला हवी त्यासाठी अभ्यासपूर्ण ताकद आणि बदल घडवण्याची तयारी तिच्यात असायला हवी..
टेंशन आहे म्हणुन स्त्रीया व्यसनांकडे वळतात हे साफ चुकीचे आहे.. फक्त स्त्रीनेच सगळ्याना समजुन घ्यायची गरज नाही तर नातेवाईक , मित्रपरिवार , समाज या सगळ्याची ती जबाबदारी आहे कारण एकटी स्त्री ही उपभोगाची वस्तु नसुन तिच्यामागे जर पुरूष उभा राहिला तर समाज परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही..
सोच बदलो.. देश बदलेगा.

सोनल गोडबोले

 

#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *