हा विषय माझे वाचक khaserao sable patil यांनी सुचवला आहे त्यांची मी
मनापासून कृतज्ञ आहे.. तुम्ही सुचवलेल्या विषयान्मुळे माझा खुप अभ्यास होत आहे.. मी इंडीजीनस न्युट्रीशन सर्टीफाइड आहे त्यामुळे अभ्यासपूर्ण लिहीणार आहे..
उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सानिध्यात रहाणे.. भगवंताच्या सानिध्यात रहाणे असा उपवासाचा अर्थ आहे…आणि आहारशास्त्राच्या दृष्टीने पंधरा दिवसातुन एकदा ताक किवा नारळपाणी घेउन उपवास केला तर पोटाला आराम मिळतो.. विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात.. त्वचेचे प्रॉब्लेम दुर होतात आणि वजनावर नियंत्रण मिळवता येतं.. पण यातील कुठल्याही गोष्टीवर अभ्यास न करता आई किवा सासु करते म्हणुन स्त्रीया उपवास करतात आणि साबुदाण्याचे पदार्थ खातात ज्यातुन शरीराला काहीही मिळत नाही उलट साबुदाणा पचायला जड असतो आणि त्यातील दाण्याच्या कुटामुळे खुप जणाना ( ॲसीडीक प्रवृत्ती असलेल्याना ) त्रास होतो. त्यापेक्षा फळं , कंदमुळं खाऊन उपवास करावा आणि उपवासाला हे चालत नाही ते चालत नाही असा बाऊ अजिबात करु नये.. उपवासाच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत हेही स्त्रीया सांगतात.. मासिकपाळी असताना उपवास करु नये किवा पुजा करु नये हेही त्या सांगतात पण शास्त्रात असा कुठेही उल्लेख नाही.. मासिकपाळी नैसर्गिक आहे . तिला विटाळ म्हणुन हिणवुन आपलाच अपमान करु नका.. उपवासाच्या दिवशी थोडा आराम म्हणुन किवा अशक्तपणा असेल तर शारीरिक संबंध ठेवले नाहीत तरी चालेल पण त्याला वेगळे स्वरुप देउ नका..आणि उपवासाने किवा डाएट ने अशक्तपणा येतो म्हणजे काहीतरी चुकतय त्यामुळे त्यावर अभ्यासपूर्ण जरुर काम करावे..
अनेक स्त्रीया आठवड्यातुन २/३ उपवास करतात आणि देवाच्या नावाखाली कोणी अनवाणी चालतं तर कोणी काळं वस्त्र घालत नाही तर कोणी भाजकं खात नाही तर कोणी तळलेलं खात नाही .. प्रत्येकीच्या नाना तऱ्हा.. पण यामागे आपल्या शरीराला कशाची गरज आहे.. काय खाल्ले पाहिजे.. कधी आणि किती खाल्ले पाहिजे याचा अभ्यास करायलाच हवा ना. दुर्दैवाने तो केला जात नाही..
आपल्याकडे पुर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे घरातील मुलं आणि पुरूष यांनी आधी जेवायचं म्हणजेच काय तर ताजं आणि गरमागरम जेवण पुरुषांना आणि राहिलेलं शीळं किवा गार अन्न स्त्रीला.. आजही अनेक घरात हे चित्र दिसतं.
दुसऱ्या दिवशी राहिलेलं अन्न फेकायला नको म्हणुन स्त्री खाते परिणामी वाढणारे वजन आणि त्याची पौष्टिकता अजिबात नाही . अन्न फ्रीजमधे ठेउन खाणे तर सगळ्यात वाईट..फक्त पोट भरणं हाच तिचा आणि घरच्यांचा उद्देश असतो.. अन्न हे मुळात परब्रह्म आहे.. जी स्त्री ते शिजवते ती मनाने आणि शरीराने निरोगी असायला हवी.. तिचा आहार शास्त्राचा अभ्यास हवा. कधी , किती आणि काय खायचे याचे तिला ज्ञान हवे.म्हणजेच काय तर चौफेर शिक्षण महत्वाचे..
घरातील माणसे म्हणजेच सासु सासरे , नवरा , मुलं यांनी तिचा आदर करायला हवा आणि तिने तो स्वतः मिळवायला हवा. ती संपूर्णता समाधानी असेल तर स्वयंपाक करताना तिचा विचार हा समाधानी असेल. तिच्या विचाराने संपूर्ण कुटुंब समाधानी रहाणार आहे. तिला आध्यात्मिक ज्ञान असेल तर ती आतुन आनंदी राहिल आणि सगळ्याना आनंदी करेल..
आपले शरीर हे प्रोटीन्स साठवत नाही म्हणजेच प्रत्येक जेवणात आपल्याला प्रोटीन्स युक्त आहाराची गरज असते त्यासाठी शाकाहार उत्तम आहार आहे.. प्राण्यांना मारुन आपण आपली प्रोटीन्सची गरज भागवु शकत नाही .. भगवद्गीतेमधे हे पाप आहे असं सांगितले आहे त्यामुळे शाकाहार पसंत करा.. उपाशी रहाणे म्हणजे डाएट नसुन योग्य वेळी योग्य खाणं म्हणजे डाएट .. रोजच्या आहारात पंचामृत , नारळपाणी , दुध दुधाचे पदार्थ , कारळं , जवस चटण्या , तीळ , ओलं खोबरं, पालेभाज्या , मोड आलेली कडधान्य, डाळी , भाकरी , भाज्या , फळं याचा मुबलक पुरवठा असेल आणि मुखात भगवंताचे नाव असेल तर आपण आनंदी आणि निरोगी रहाणार यात शंकाच नाही.. अंधश्रध्देला दुर सारुन श्रध्देने आणि अभ्यासाने आपण पुढे जायचे आहे.. जोडीला व्यायाम हवाच..
सोनल गोडबोले.. हरे कृष्ण
..