उस्माननगर गावास तालुक्याचा दर्जा द्या – शिवा संघटना संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष,प्रा.मनोहर धोंडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी

 

कंधार : प्रतिनिधी

नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर हे गांव पूर्वीच्या निझामकालीन तालुक्याचे गाव होते. हे गांव मध्यवर्ती व विकसनशिल असलेले हे गांव पूर्वीच्या काळापासून व्यापार, शिक्षण व महसूल क्षेत्रात महत्वपूर्ण व प्रमुख गाव म्हणून ओळखल्या जात आहे. गावात आरोग्य, शिक्षण, व्यापार व्यवसायासाठी आजही हे गांव जवळपासच्या ९० ते १०० गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी असून सर्वांच्या संपर्कासाठी सोयीचे आहे. हे नांदेड-लातूर नॅशनल हायवेवर वसलेले असून गावामध्ये तालुका दर्जा देण्याच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.

प्रलंबीत गावातील आजुबाजूच्या व खेडयातील नागरीकांची मागणी आहे की, सदरच्या गावाला तालुक्याचा दर्जा मिळुन तालुका करण्यासाठी गावातील व आजुबाजूच्या खेडयातील उस्माननगर विकास परिषद ही कृती समिती स्थापन करुन शासनाकडे गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून १९८५ पासून उस्माननगर या गावास तालुक्याचा दर्जा मिळण्याची मागणी शासन स्तरावर आहे. गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून आवश्यक ती कागदपत्रे व पुरावे दाखल करुन वारंवार विनंती केली जात आहे.

यापूर्वी शासनाने नविन तालुक्याची पुनर्रचना करतांना या गावास तालुक्याचा दर्जा दिला नाही. त्यामुळे या भागातील जनतेत अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

शासन स्तरावर तालुका निर्मितीत विचाराधिन असलेले गांव आपल्या कारकिर्दीत तालुका म्हणून घोषीत व्हावे यासाठी उस्माननगर विकास परिषदेच्या वतीने मागणी केली जात आहे. आमच्या भागातील जनतेच्या विकासासाठी आवश्यक असलेली उस्माननगर या गावास तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य करावी असे शिवा संघटना संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष,प्रा.मनोहर धोंडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *