कंधार :
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण तालुक्यातील नारनाळी गावातील महिला व नागरिक गावातच ये-जा करणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमणं झाल्यामुळे पाणी, व जायला रस्ता नसल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये गुरे, वासरे व लहान मुलांसह महीला व नागरिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आमरण उपोषणाला बसले आहेत.
कंधार तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या नारनाळी गावात येजा करणाऱ्या चक्क रस्त्यावरच गावातील काही लोकांनी अतिक्रमणं केले असल्यामुळे त्यांचा त्रास गावाला होत असून यामुळे ना पाणी, विद्यार्थ्याला शाळेला जाण्यासाठी रस्ता नाही जाण्यासाठी त्यामुळे समस्या बिकट झाली आहे. मात्र या समस्या प्रशासनाला दिसत नसल्याने निद्रीस्त प्रशासन व लोकप्रतिनिधीप्रति गावकऱ्यांत तीव्र असंतोष पसरला आहे.
*नारनाळी येथील शाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक ओठा ते हनुमान मंदिर जाणारा रस्ता व पाण्याची पाईपलाईन अडवलेली मोकळा करून दिले नसल्यामुळे ७ पासून आमरण उपोषणासाठी बसले आहेत. यासाठी प्रशासनाला १२ फेब्रुवारी २०१९, २० जानेवारी २०२०, १० व २१ एप्रिल २०२३, २ व १४ ऑगस्ट २०२३, ५ सप्टेंबर २०२३ दिले आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, नारनाळी येथील अण्णाभाऊ साठे ओठा पासून ते हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता व नळाची पाईपलाईन रस्त्यावर मुरूम व कच्चे बांधकाम करून अडवन्यात आली असून पत्रानुसार वारंवार विनंती करण्यात आलेली आहे, परंतु वरील पत्रांचा विचार केला नाही व कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई तक्रारदारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने केली नाही.
तसेच जिल्हाधिकारी नांदेड यांना सुद्धा निवेदन देऊन वरील अडवलेला महत्त्वाचा रस्ता व पाईपलाईन पूर्ववत करून देण्यासाठी विनंती करण्यात आलेली होती. त्यामध्ये अर्जदार दिनकर मारोती अडकिने यांनी वारंवार पाठपुरावा करूनही अर्जाची दखल घेतलेली नाही. तहसील कार्यालय कंधार यांना सुद्धा रस्ता अडवल्यामुळे पाणी व रस्त्याच्या सोयी पासून वंचित असलेल्या कुटुंबातील महिलांनी निवेदन देऊन उपोषणाचा मार्ग अवलंबून सुद्धा सदरील रस्ता खुला करून देण्याबाबत प्रशासनाकडून कुठलीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नाही. २०१९ पासून ते २०२३ पर्यंत केलेले पत्रव्यवहार त्या प्रत्येक पत्राच्या प्रत माननीय गटविकास अधिकारी साहेब, तहसीलदार साहेब व ग्रामपंचायत यांना देऊनही आम्हाला न्याय मिळालेला नाही. पुन्हा अंतिम निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. हा रस्ता १९८३ पासूनचा आहे काही समाजातील लोकांनी जाणीवपूर्वक रस्ता व पाण्याची पाईपलाईन आढवून करून २० ते २५ घरातील लोकांना शासकीय सुविधेपासून पाणी व रस्त्यापासून वंचित ठेवून वेटीस् धरीत आहेत, त्यामुळे नाहक त्या कुटुंबांना पाण्याचा व रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यातीलच मी एक तक्रार असून मी मागील दोन वेळेस ग्रामपंचायत कार्यालय नारनाळी व तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय कंधार येथे उपोषणास बसून सुद्धा आपण आश्वासन देऊन रस्ता खुला करून देण्याबाबत माझे उपोषण सोडवण्याबाबत आपण कळवले आहे, परंतु एक वर्षाचा पूर्ण कालावधी संपूर्ण अध्याप पर्यंत आम्हाला रस्ता व नळाची जोडणी करून दिली नाही त्यामुळे शेवटी मी ना इलाजास्तव माझे कुटुंबातील महिला व माझे गुरे जनावरे सह मी आपल्या कार्यालयासमोर समोर उपोषणासाठी 7 मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे महिला व गुरेढोरेसह उपोषनास बसलो आहोत. त्याच कालावधीमध्ये पंचायत समिती कंधार येथे पुरुष मंडळी यांचे आमरण उपोषण राहणार आहे. त्यामुळे आपण वरील निवेदनाची तात्काळ दखल घेऊन रस्ता खुल्ला करावा. अन्यथा होणाऱ्या परिणामास आपण व आपली संपूर्ण यंत्रणा जबाबदार राहील.
*हा रस्ता पुर्वी पासूनचा आहे पण त्यावर काही जणांनी अतिक्रमण केले आहे. याचा ३० ते ४० घरांना ये-जा करण्यासाठी त्रास होत असून १० ते १२ वेळेस ग्रामपंचायत स्तरावर मिटिंग घेतल्या पण याबाबत कोणताच मार्ग निघाला नाही. –
भुजंग देव्हारे सरपंच प्रतिनिधी नारनाळी.
*या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमण हे १० ते १२ वर्षांपूर्वीचे आहे. मी या ग्रामपंचायतीचा कार्यभार मे २०२३ पासून घेतला असून २०१८-१९ पासूनचे ग्रामपंचायत फेर आकारणी रजिस्टर माझ्या जवळ आहे.
– ग्रामसेवक बारमळे पी.एस.