कंधार: दिनांक 08/03/2024
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उप सेवा केंद्र कंधार तर्फे दिनांक 8 मार्च महाशिवरात्री निमित्त व महिला दिनानिमित्त कंधार नगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार ब्रह्माकुमारी ज्योती बहेनजी यांच्या हस्ते ईश्वरीय भेट देऊन कऱण्यात आला.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र कंधार तर्फे दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्री निमित्त ध्वजारोहण व ईश्वरीय ज्ञान (परमात्म्याचे सत्य परिचय) संदेश दिला जातो. या कार्यक्रमाची सुरुवात ईश्वरीय स्मृती गीताने करण्यात आली.
त्यानंतर ईश्वरीय महावाक्य, शिव ध्वजारोहण आणि ईश्वरीय प्रतिज्ञा याचे वाचन करुन सर्वांना आपण कोण आहोत, कुठून आलोत आणि आपला खरा आत्मिक परिचय काय आहे याचे ज्ञान देण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून व महिला दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज कंधार च्या संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती बहेनजी
एमेकर सर यांच्या प्रेरणेतून कंधार नगरपालिकेतील महिला साफ-सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्याचे आयोजित केले होते.
त्याप्रमाणे मोठ्या संख्येने नगरपालिकेतील महिला साफ – सफाई कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्योती बहेनजी या सर्व महीला कर्मचाऱ्यांना कॅलेंडर , नारी तू कल्याणी पुस्तक, शिव संदेश, प्रसाद आणि पिस देऊन त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात नीलकंठ मोरे, मुत्तेपवार सर, खंडेराव पांडगले , भानुदास वाडीकर, डॉ. लक्ष्मीकांत पेठकर आदींसोबत अनेक ईश्वरीय प्रेमीची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशसवीतेसाठी ज्योती बहेनजी, सतिश भाई, ज्ञानेश्वर भाई,संगीता माता, डॉ. वर्षा डांगे, सिमा बहन, चंद्रकला माता, पार्वती माता, पदमा माता, शिवानी बहन, अश्विनी माता, विजय भाई, ओमकार भाई, पार्थ भाई, साई भाई, श्रद्धा बहन, सृष्टी बहन इत्यादींनी सहकार्य दिले.