कंधार / लोहा ( दिगांबर वाघमारे )
लातूर लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी SWEEP कार्यक्रमांतर्गत लोहा मतदार संघात दि .5 मार्च रोजी लोहा मोड शिवाजीनगर लोहा येथे पाली टाकून वास्तव्यास राहिलेल्या मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना मतदानाची शपथ देण्यात आली. स्विप कक्षाच्या वतीने गेल्या काही दिवसापासून लग्नकार्य, वाढदिवस, शाळा कॉलेज,आणि परिसरातील झोपडपट्टी,पाल, विटभट्टी आदी ठिकाणी मतदान जनजागृतीसाठी घेत असलेल्या परिश्रमा बद्दल या स्वीप कक्षातील सर्व कर्मचात्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
लातूर लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढपिण्यासाठी SWEEP कार्यक्रमांतर्गत लोहा मतदार संघात SWEEP कार्यक्रमांतर्गत सर्व जिल्हा परिषद शाळा, तसेच खाजगी च्या अनेक शाळांनी यात सहभागी घेऊन मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत केली.लातूर
लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक
निवडणूक निर्णय अधिकारी तथा कंधारच्या उपविभागीय अधिकारी सौ. अरुणा संगेवार, कंधारचे तहसिलदार रामेश्वर गोरे, लोहयाचे तहसिलदार विठठल परळीकर यांच्या आवाहना नुसार
41 लातूर 88 लोहा विधानसभा मतदार संघांतर्गत स्विप कक्षाच्या वतीने लॉ कॉलेज साठे नगर कंधार, बहादरपुरा, तसेच पानभोसी रोड कंधार येथील वीट भट्टी या ठिकाणी मतदान जनजागृती करण्यात आली व मतदाराला मतदानाची शपथ देण्यात आली यावेळी स्वीप कक्षाचे
एन एम वाघमारे, मदन घुगे, डी एन मंगनाळे, सूर्यकांत गोणारे, संतोषी थगणर, माधव भालेराव, नवनाथ बोळकेकर यांची उपस्थित होती.
दरम्यान आज श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी आज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या अनुषंगाने फुलवळ गावात मोटरसायकल रॅली काढली व दिनांक 7/5/24 च्या मतदानाबद्दल जनजागृती करण्यात आली. तसेच श्री शिवाजी विद्यालय बारूळ , व जि.प.प्रा.शाळा ग ऊळ , मतदान जनजागृती रॉली काढण्यात आली जिप प्रा शा मुंडेवाडी. ता.कंधार येथे मतदान जन जागृती प्रभात फेरी काढण्यात आली व मतदारांना प्रतिज्ञा देण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी आशा ताई व विद्यार्थी नागरिक उपस्थित होते.