बापाविषयी मान्यवरांच्या भावना समजून घेण्यासाठी वाचायला हवा ‘माझा बाप’ हा ग्रंथ – प्राचार्य डॉ. हनुमंत भोपाळे


नांदेड (११/०९/२०२०)

सुप्रसिध्द पत्रकार विनोद बोरे, जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युटचे मास्टर कोच विद्यार्थी ह्रदयसम्राट इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर व जेष्ठ समाजसेविका अर्चना बोरे यांनी ‘माझा बाप’ नावाचे पुस्तक संपादित करून ‘बाप’ ह्या नात्याची उकल वाचकांसमोर ठेवली आहे. बाप या नात्याचे विविध पदर समजून घेण्यासाठी सदरिल पुस्तक उपकारक ठरणारे आहे अशी प्रतिक्रिया अर्धापुरच्या शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत भोपाळे यांनी व्यक्त केली आहे.

जेष्ठ साहित्यिक कवी डॉ. जगदीश कदम रुईकर, निर्मल प्रकाशन नांदेडचे संस्थापक निर्मलकुमार सुर्यवंशी, प्राचार्य आनंद कदम, वर्कशॉप कॉर्नर नांदेड येथील शिवार पुस्तकालयाचे संस्थापक प्रा. पंडीत कदम, मिडिया पार्टनर स्वप्निल बेंद्रीकर, माध्यम सल्लागार प्रा. रामेश्वर बद्दर रेणापुरकर, निवेदक देवदत्त साने, राजमुद्रा न्युज लाईव्हचे मुख्य संपादक संगमेश्वर लांडगे, युगसाक्षी न्युज लाईव्हचे संपादक दिगांबर वाघमारे यांच्या पुढाकाराने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘हाजीर हो घरोघरी’ या अभियानांतर्गत प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.


देशाचे लोकनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक डॉ. शरदचंद्र पवार अर्पण केलेल्या माझा बाप या ग्रंथाला दैनिक सकाळ वृत्तसमुहाच्या विदर्भ आवृत्तीचे प्रमुख संदीप भारंबे यांची प्रेरक प्रस्तावना लाभली आहे. संपादकीय मनोगतात ‘स्वत:च्या सुखदुःखाकडे दुर्लक्ष करून कुटुंबासाठी धडपडणारा बाप अडगळीत पडलाय’ ही सल बोलून दाखविणारा हा संग्राह्य ग्रंथ बापाविषयी कृतज्ञता रूजविण्याच्या कामी नक्कीच मदत करणारा आहे.

डॉ. सीमा तायडे, डॉ. रेखा पाटील, डॉ. उज्ज्वला मापारी, स्नेहा खेडेकर, नम्रता वायाळ, स्मिता देशमुख, वनिता देशमुख या सात मान्यवर महिलांनी आपल्या वडिलांविषयी लिहिले असून चोवीस महनीय पुरूषांनी या पुस्तकात बापाविषयी लिहिले आहे. खरं तर लेकी आपल्या बापाविषयी अधिक भरभरून बोलतात अन् मुलं आईविषयी अधिक माया व्यक्त करतात. नवरीबाई घरात आली की, जन्मदात्यांविषयी माया पातळ होते, पण काहीजण अशा परिस्थितीतही आपल्या आई-वडिलांना प्रेम देतात, सेवा करतात याचं मुर्तीमंत दर्शन माझा बाप या ग्रंथात घडते.


सहसंपादक तथा वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्रभुषण पुरस्कारप्राप्त समुपदेशक, सुप्रसिध्द वक्ते इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वनअधिकारी शिवश्री कामाजी पवार, महाराष्ट्र प्रदेश महासचिव इंजि. मधुकर मेहेकरे, दैनिक देशोन्नतीचे इडिटर इन चिफ प्रकाश पोहरे,

आ. अमित झनक, सुप्रसिध्द वक्ते प्रदीपदादा साळुंके, उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सनदी अधिकारी सिध्दार्थ खरात, डॉ.संतोष हुशे, उद्योजक संजय वायाळ, जेष्ठ नेते श्याम उमाळकर, माधवराव जाधव, संपादक विनोद बोरे, नितीन शिंगणे, भास्करराव गारोळे, शेषराव रिंढे, निरंजन मापारी, प्रा. अशोक तेजनकर, सिध्देश्वर पवार, धनंजय चनखोरे, प्रा. प्रदीप चोरे, शंकर जोगी, राजेंद्र काळे, संजय राजगुरू या लेखकांनी लिहिलेले लेख वाचनीय व संग्राह्य आहेत.

सर्वांनी हे पुस्तक वाचले तर नक्कीच ज्यांना वडिलांचा राग आल्यामुळे जे मनाने दूर गेले आहेत ते नक्कीच जवळ येतील आणि वृध्दाश्रमांची संख्या कमी व्हायला मदत होईल असे नमूद करून प्राचार्य डॉ. हनुमंत भोपाळे यांनी सर्व लेखकांचे, संपादन मंडळाचे व शिवार पुस्तकालयाचे संचालक हरिनाम कदम यांचे अभिनंदन केले आहे.

सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश मा. न्या. भिमराव नरवाडे पाटील साहेबांच्या हाजीर हो या आत्मचरित्राप्रमाणेच कँलनमँपल पब्लिशिंग, नोशनप्रेस व मावेरिक आर्टिस्टच्या आगामी अंतर्नाद व शिवास्त्र या बहुपयोगी ग्रंथांचेही वाचक भरभरून स्वागत करतील असा विश्वास डॉ. हनुमंत भोपाळे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *