नांदेड, दि. 21 एप्रिलः- जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने रविवारी सकाळी 7.30 वाजता मतदान जनजागृतीसाठी “वॉकथॉन” रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते “मी मतदान करणारच” या सेल्फी पॉईंटचे फित कापून व सेल्फी काढून शुभारंभ करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते वॉकथॉन रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.
यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, विस्तार अधिकारी रुस्तुम आडे आदींची उपस्थिती होती. या वॉकथॉन रॅलीस ए एम सी गुलाम सादिक, डि एम सी कारभारी दिवेकर, डी वाय ई संघरत्न सोनसळे, क्षेत्रीय अधिकारी रावन सोनसळे, रमेश चवरे, संजय जाधव, निलावती डावरे, सी ए ओ तुकाराम भिसे, सीए एफओ जनार्धन पकवाणे, माता गुजरीजी विसावा उद्यानचे अधिक्षक बेग, सहाय्यक आयुक्त सुधीर हिंगोले, डॉ. बडी, डॉ. बिसेन, राजेश फटाळे (सर्व मनपा कार्यालय), क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, श्रीमती शिवकांता देशमुख, चंद्रप्रकाश होनवडजकर, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, श्रीमती सारिका आचणे, डॉ. राजेश पावडे, प्रलोभ कुलकर्णी, रवी ढगे, साईनाथ चिद्रावार, साईराज मुदीराज हे सर्व स्वीप सदस्य आदी मान्यवर व नांदेड जिल्हयातील विविध एकविध खेळ संघटनेचे खेळाडू (मुले-मुली) व पदाधिकारी विविध शासकीय- निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी/ कर्मचारी विविध पोलिस भरती अकॅडमीचे मुले-मुली, प्रशिक्षणार्थी आदीनी उपस्थित राहुन उर्स्फूत प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रलोभ कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांनी मानले. या वॉकथॉन रॅलीस डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परीसर येथून सुरुवात होऊन स्टेडीयम मुख्यद्वार मार्गे आयटीएम कॉलेज- महात्मा फुले पुतळा आयटीआय चौक-मार्गे शिवाजीनगर, बसस्टॅड- वजिराबाद चौक, छ. शिवाजी महाराज पुतळामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत काढण्यात आली. शेवटी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मतदानाची प्रतिज्ञा नवमतदार खेळाडूंना देण्यात आली व रॅलीचा समारोप करण्यात आला.
ही वॉकथॉन रॅली जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आली होती. यासाठी क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, श्रीमती शिवकांता देशमुख, चंद्रप्रकाश होनवडजकर, वरिष्ठलिपीक संतोष कनकावार, संजय चव्हाण तसेच हनमंत नरवाडे, आकाश भोयर, बंटी सोनसळे, शेख इक्रम, मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, सोनबा ओव्हाळा, यश कांबळे आदीनी सहकार्य केले.