आज दिनांक 22.05.2024 रोज बुधवार नांदेड ते दिल्ली पाचजन ,माधव फुलवरे ,महेंद्र बोराळे , किशन ठोंबरे, दुर्गादास कदम , ऋषीकेश ढेंबरे आज रेल्वेने प्रवास सुरू उद्या दिनांक 23.05.2024 वेळ सकाळी 09.30 वा दिल्लीला पोहचणार दि.24.05.2024 दुपारी 3.21 वा.
प्रवास सुरूच आहे थोड्या वेळापूर्वी मनमाड स्टेशनला सायंकाळी सहा वाजून 22 मिनिटाला गाडी पोहोचली जवळपास अर्धा तास गाडी थांबून तिथून दिल्लीच्या दिशेने परत प्रवास सुरू झाला व मधले आग्रा,झांसी मार्ग दिल्ली येथे दि.24.05.2024 दुपारी 3.21 वा पोहोचलोत
Sapphire Dx A Blend Of Boutique Hotel 87 Krishna Gali Opp.Naw Delhi Railway Station Pahar Ganj New Delhi 110055 रूम केली
दिल्लीचा परिसर पाहण्यासाठी निघालो व चेम्स फोर्ड एनक्लेव्ह व राजीव गांधी चौक येथे राजीव गांधी पार्क येथे भारताचा भव्य दिव्य ध्वज फडकत असताना अतिशय आनंद झाला आजूबाजूचा बगीचा परिसर अतिशय मनमोहक दृश्य आपल्याला पाहावयास मिळते आज दिल्ली येथील चेम्स फोर्ट एनक्लेव्ह राजीव गांधी चौक /पार्क फिरून पाहिलं रात्री 8.40 जम्मू तवीसाठी निघालो व दि25.05.24.सकाळी 06.14 पोहचलो व येथुन कटरा येथे जाण्यासाठी निघालो परत दुसर्या ट्रेन मध्ये कटरा येथे पोहचलो
दिल्ली ते जम्मू तवी ते कटरा येथे सकाळी दहा वाजता पोहोचलोत व रूम शोधण्यासाठी एक ते दीड तास वेळ लागला कांता इंटरनॅशनल रूम केली ( Hotel Kanta International Railway Road , Katra (Vaishno Devi ) J&K सर्व R F ID Card जण काढण्यासाठी (वैष्णोदेवी देवीच्या दर्शनासाठी पास) गेलोय परत रूम येवुन स्नान करून वैष्णोदेवी देवीच्या दर्शनासाठी ठिक एक वाजता निघालो दर्शनासाठी जाण्यासाठी कांता इंटरनॅशनल जाणण्यासाठी छोटा हत्ती गाडी देण्यात आली व दर्शन घेण्यासाठी रांगेत सोडवण्यात आले
वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात पायी दर्शन घेण्यासाठी निघालो व माता वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात जाण्यासाठी जवळपास दोन तास तीस मिनिटे लागली मग दर्शन घेण्यासाठी आपल्याजवळ फक्त आधार कार्ड व दर्शन पास असावा असे सुचेना होती त्यामुळे लाॅकर करावा लागला तीथ सुद्धा रांग होतीच तसेच रांगेत उभं राहून लाॅकर मिळाले मग लाॅकर सर्व साहित्य ( शुज, कमरेचा बेल्ट, मोबाईल, वाॅलेट, वाॅच) फक्त पैसे व आधार कार्ड , मंदिर दर्शन पास घेऊन माता वैष्णोदेवी देवीच्या दर्शन घेण्यासाठी रांगेत उभा राहीलो सहा वाजले तेव्हा दर्शन मिळाले माता वैष्णोदेवी मंदिर पर्वताच्या दगडाच्या आत आहे प्रवेश द्वारातून दर्शन घेतलो पर्वताला पोखरून सूरूंग तयार केलेल्या मार्गाने आत प्रवेश करून जवळून दर्शन घडले मग मंदिराच्या दान पेटीत सर्वांच्या नावाने दक्षणा ( पैसे ) दिलो मग तिथुन बाहेर आलो प्रसाद घेतला व लाॅकर निघालो व सर्व साहित्य घेऊन परत श्री भैरौ बाबांच्या दर्शनासाठी निघालो
श्री भैरो ( भैरवनाथ) मंदिरासाठी निघालो वैष्णोदेवी पासुन श्री भैरवनाथ मंदिर तिनं कि.मी अंतरावर वैष्णोदेवीच्याही वरती आहे तिथं जाण्यासाठी एक तास तीस मिनिटे वेळ लागला सायंकाळी सात वाजुन पंधरा मिनिटे झाली होती मात्र मंदिर बंद करण्यात आले आता हे मंदिर एक तास पंचेचाळीस मिनिटानी परत उघडणार होते श्री भैरवनाथ मंदिर उघडल्या नंतर लगेच दहा मिनिटात दर्शन झाले व भैरो बाबांच्या लंगर मध्ये जेवन करून परत परतीचा प्रवास सुरू केला मंदिराचा परिसर आता पर्यंत आम्ही माता वैष्णोदेवी व भैरवनाथ दर्शनासाठी वीस ते बावीस कि.मी अंतर पायी गेलेला होता तेवढाच परत चालत जायचे ही सर्वात मोठी गोष्ट होती तरी सुद्धा कुठेही न बसता न थांबता खाली रूम येण्यासाठी रात्रीचे अकरा वाजून दहा मिनिटे लागली वेळ तीन तास लागला मग अल्प आहात घेतला व रात्री बारा वाजून पंधरा मिनिटे रूम मध्ये आलो चर्चा करण्यात वेळ गेला मध्य रात्रीचे एक वाजून तीस मिनिटे झाली होती
माता वैष्णोदेवी व बाबा भैरौनाथ दर्शनाने मन अतिशय तप्त झाले मंदिराच्या परिसरात भाविकांना भेटायला मिळाले यात एक कुटुंब मिळाले मी कोण आहे माहित नसताना सुद्धा आपल्या मुला सारखं समजून अतिशय मनमिळाऊ वृत्तीने वागले श्री शर्मा फॅमिली झारखंड येथुन होते तसेच वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांशी संवाद साधत माता वैष्णोदेवी व बाबा भैरौनाथ दर्शन झाले
असा सुखद प्रवासाचे कुठेही न थांबता कुठेही न बसता दिवस भरात 44 कि.मी चालुन चालुन सुद्धा थकवा आला आता पर्यंत एवढा अंतर कधीच एका दिवसात चाललेला नव्हता मनात एकच इच्छा होती ती दर्शन वेळवर झालं पाहिजे असा हा प्रवास खुप आनंदात झाला उद्या येथुन आम्ही श्रीनगरला जाणार आहोत .
कटरा ते श्रीनगर
लेखन. महेंद्र विठ्ठलराव बोराळे, नांदेड महाराष्ट्र