जेईई JEE (Advanced) परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

जेईई JEE (Advanced) परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड दि. 24 मे :- जेईई JEE (Advanced)-2024 परीक्षा रविवार 26 मे 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत दोन सत्रामध्ये नांदेड जिल्ह्यात 4 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

या आदेशात नमूद केलेल्या आयऑन डिजीटल झोन विष्णुपुरी नांदेड, होरिझोन इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूर रोड विष्णुपुरी नांदेड, राजीव गांधी कॉलेज कॅम्पस, विद्युतनगर नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजी नांदेड शामल एज्युकेशन कॅम्पस देगावरोड समोर नांदला दिग्रस खडकूत या 4 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात रविवार 26 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही.

तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी, पेजर, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *