संपादक यासीन बेग इनामदार यांचे दुःखद निधन

 

साप्ताहिक लोक भास्करचे कार्यकारी संपादक तथा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष मिर्झा यासीन बेग इनामदार यांचे गुरुवारी दि.23 मे 2024 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले.
मृत्यूसमयी ते 43 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, दोन बहिणी,पत्नी,दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
बिलोली येथील रहिवासी असलेले यासीन इनामदार यांची अत्यंत मितभाषी अशी ओळख होती.मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ते ख्यातकिर्त होते.
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती.
राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेते त्याचबरोबर प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे व सलोख्याचे संबंध होते.
त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणू लागल्याने रात्री खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . परंतु उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यांच्या पार्थिव देहावर आज गुरुवार दि.23 मे 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता बिलोली येथील जामा मस्जिद येथे दफनविधी करून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मराठी पत्रकार परिषद, नांदेड जिल्हा व महानगर मराठी संघ तसेच नांदेड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…..!
🌹🙏🌹🙏🌹🙏
*प्रकाश कांबळे*
विभागीय संघटक
मराठी पत्रकार परिषद, मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *