मी यातच जास्त रमते..

कितीही वेगवेगळ्या विषयावर लिहीलं तरी मी यातच जास्त रमते.. काल्पनिक रोमॅन्टिक लिखाण..
लिहीताना जाणवतं की आपलं कल्पनाविश्व किती व्यापक आहे ना.. सहज एक रिल समोर आलं आणि मी त्या जागी जाऊन पोचले सुध्दा.. कोकणात भरपूर निसर्गात लहानाची मोठी झालेली मी आजही निसर्गाचा मोह आवरत नाही आणि पाऊस तो तर त्या मोगऱ्यासारखा अवतीभवती रेंगाळत रहातो.. आज अंगणात फुललेला मोगरा पाहिला आणि त्याला श्वासात भरताना प्रियकर आठवला.. आणि क्षणार्धात त्याला घेउन एका उंच स्वर्गीय जागी जाऊन पोचले सुध्दा…तिथे पोचल्यावर वाऱ्याने कानात रुंजी घातली त्याला कारण माझी बट.. बटेला बाजूला सारायला गेले आणि तितक्यात एक राकट पण प्रेमळ हात पुढे सरसावला जो त्याचा होता.. माझ्या बटेला दुर सारण्याचा अधिकार तुला कोणी दिला असं मी त्याच्यावर ओरडणार तितक्यात लक्षात आलं की एक किडा माझ्या केसात अडकला होता त्यामुळेच की काय तो खोडकर वाराही जोरजोरात वहात होता.. जेणेकरून त्या किड्याने माझा चावा घेउ नये.. सिच्युएशन एक असते आणि आपण रीॲक्ट वेगळ्या पध्दतीने होतो हे मला त्यावेळी जाणवलं .. आपण कितीही प्रेमात असलो तरीही आजूबाजूच्या गोष्टीचं भान आपल्याला असायलाच हवं ना..

पुन्हा जोराची एक झुळूक आली आणि त्या किड्याने हवेत मुक्तपणे विहार केले .. त्याच्याकडे मी पहात असताना अलगद त्याच्या दणकट हाताने मला करकचुन मिठी मारली..मी म्हटलं , आता दुसरा किडा कंबरेवर बसला की काय ??.. माझ्या विनोदाने दोघेही खळखळुन हसलो आणि त्याचक्षणी त्याचे ओठ कंबरेच्या कमानीवर सुर धरु लागले..

स्त्रीच्या कंबरेइतका सुंदर अवयव कुठलाच नसावा ना.. त्यावर सातही सुर फेर धरु शकतात …
आऊच असा सुंदर शब्द तोंडातून निघाला आणि त्याची बोटं माझ्या कर्णपटलावर वेलीसारखी वावरु लागली कारण त्याला केस बाजूला सारुन कानात काहीतरी सांगायचं होतं.. मला माहित होतं तो टिपीकल पुरुषांसारखा आय लव्ह यु नक्कीच म्हणणार नाही .. मग काय असेल बरं???.. मी उत्सुकतेने त्याच्या मादक शब्दांची वाट पहात त्या खडकावर उभी होते .. त्याने झुमक्याला बाजूला सारुन कानाचा अलवार चावा घेतला आणि तितक्यात मी दात लागले ना असं जोरात ओरडले तेव्हा त्याने त्या झुडपातल्या सापाकडे बोट दाखवत म्हणाला , तो असाच चावेल .. चल पळु इथुन..हाहाहा .. काहीही नाही.. पावसाळा सुरु होतोय.. कुठेतरी रोमान्स करत बसाल आणि नको त्या वेळी त्याची एंट्री व्हायची.. हे किडे , साप नको तिथे कडमडतात राव.. इतकं छान लिहीत होते .. यांचं इथे काय काम ??.. अंगात किडे असले की असं होतं..

#SonalSachinGodbole

#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *