द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी मयुर कांबळे यांची निवड

 

(दिगांबर वाघमारे )/ नांदेड

कंधार येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पत्रकार मयुर कांबळे यांच्या कार्याची दखल घेवून त्यांची नुकतीच द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नांदेड जिल्हयातील ग्रामीण भागातील युवा पत्रकारांना येणाऱ्या अडीअडचणी त्याचबरोबर ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी काम करणार असल्याची माहीती त्यांनी या निवडी बद्दल दिली ,

नांदेड जिल्हयात द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या विस्तारासाठी ग्रामिण युवा पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, सदस्य म्हणून सहभाग नोंदवण्याचे आवाहन मयुर कांबळे यांनी केले.

 


द युवा ग्रामीण पत्रकार संघटने विषयी थोडक्यात परिचय :ग्रामीण पत्रकार संघटनेची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातून करण्यात आली.
ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, प्रदेश कार्याध्यक्ष श्याम कांबळे यांनी केली.

युवा ग्रामीण भागात पत्रकारांना येणाऱ्या अडीअडचणी त्याचबरोबर ग्रामीण भागातील पत्रकारांना न्याय हक्कासाठी झिजावे लागणारे उंबरठे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील पत्रकारांना कायदेशीर मार्गदर्शन व पत्रकार एकजूट मधून मिळणाऱ्या न्याय हक्कासाठी व पत्रकारांचे प्रश्न प्रशासन दरबारी मांडण्यासाठी त्याचबरोबर ज्या मृत पत्रकारांच्या कुटुंबाना आत्मनिर्भर तसेच त्यांना स्वावलंबी बनवून आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी संघटनेने विवध धोरण आखले आहे, ग्रामीण पत्रकारांच्या अनेक बाबी डोळ्यासमोर ठेवून
सुरुवातीच्या काळात द युवा ग्रामीण पत्रकार संघाकडून महाराष्ट्र राज्य
स्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करून समाज घटकातील सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समाजात काम करणाऱ्या पत्रकारांव्यतिरिक्त असणाऱ्या अनेक संघटनांना सोबत घेऊन समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.

पत्रकार संरक्षण कायदा अधिक बळकट व्हावा यासाठी प्रशासनाला योग्य त्या मागण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर पत्रकारांना रुग्णालयांमध्ये सवलती त्याचबरोबर धर्मादाय कोठ्यातून पत्रकारांनाही विशेष निधी उपलब्ध करून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. याबाबत शासन दरबारी पाठपुराव्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. पत्रकारांच्या पाल्यांनीही शिक्षण व्यवस्थेत उच्चांक गाठावा यासाठी पत्रकारांच्या पाल्यांना शासकीय शिष्यवृत्ती याबाबतही शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख हे सांगतात.

पत्रकारांवर होणारे हल्ल्यांनबाबत आवाज उठवुन न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सतत प्रयत्नशील असतातच मात्र अनेकदा पत्रकारांवर हल्ला झाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो. मात्र दाखल गुन्ह्याची योग्यरित्या चौकशी होईपर्यंत त्याचबरोबर न्याय मिळेपर्यंत संघटनेचे कायदेशीर सल्लागार हरिहर गर्जे हे नेहमीच पत्रकारांना मार्गदर्शन त्यांच्यासोबत काम करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *