शेतकरी बंधूंनो कृषी निविष्ठा खरेदी करतानायाकडे लक्ष द्या
१.गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या शासनमान्य अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खते व औषधीची खरेदी करावी
2.बनावट आणि भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करावी पावतीवर बियाणाचा संपूर्ण तपशील असावा जसे की , पीक , वाण संपूर्ण लॉट नंबर , बियाणे कंपनीचे नाव , किंमत , खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता विक्रेत्याचे नाव इत्यादी नमूद करावे व पक्के बिल घ्यावे .
4. खरेदी केलेल्या बियाण्याचे वेस्टर्न म्हणजेच पिशवी , टॅग , खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे .
5. खरेदी केलेली बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी .
6. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्याचे पाकीट शील बंद किंवा मोहोर बंद असल्याची खात्री करावी
7 बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावर अंतिम मुदत पाहून घ्यावी
कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री किंवा इतर तक्रारीसाठी कृषी अधिकारी पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा .
बाजारामध्ये मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी कपाशी बियाण्याचे बाबतीत विशिष्ट एखाद्या वाणाची मागणी करू नये बीजी टू कपाशीमध्ये सर्व वाणांमध्ये सारखेच जणूक असल्यामुळे सर्व वाणांची उत्पादन क्षमता व बोंड आळी प्रतिकारक्षमता सारखीच आहे त्यामुळे सर्वांनी एकाच वाणा ची मागणी न करता बाजारात भरपूर वाण उपलब्ध आहेत ते वाण खरेदी करावेत शेतकरी बंधूंनो कृषी निविष्ठा खरेदी करतानायाकडे लक्ष द्या – कंधार तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते यांचे आवाहन केले ..