कंधार तालुक्यात कृषी विभागाची धडक कारवाई ; दोन कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित

 

(कंधार ; दिगांबर वाघमारे )

कंधार तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे तसेच उपविभागीय अधिकारी कंधार सौ अरुणा संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार तालुक्यामध्ये खरीप हंगाम 2024 मध्ये गुण नियंत्रणाचे काम गुण नियंत्रण निरीक्षक यांचे मार्फत चालू आहे .

दिनांक 12 जून 2024 रोजी श्री बालाजी नलाबले राहणार बोळका यांनी केलेल्या तक्रारीवरून मौजे कुरुळा येथील बापू कृषी सेवा केंद्र येथे चढ्या दराने बियाणे विक्री होत असल्याची तक्रार केली . त्या अनुषंगाने विठ्ठल गीते तालुका कृषी अधिकारी कंधार व गणेश यादव कृषी अधिकारी पंचायत समिती कंधार यांच्या संयुक्त पथकाने सदरील कृषी सेवा केंद्रा ला त्वरित भेट दिली असता राशी कंपनीचे आरसीएच 659 या कापूस वाना च्या बियाणे MRP पेक्षा जास्त दराने विक्री केल्याचे निदर्शनास आले.

तसेच बी बियाणे अधिनियम 1966 व नियम 1968 तसेच बियाणे नियंत्रण आदेश 1983 अंतर्गत कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता त्रुटी निदर्शनास आल्या व नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले संयुक्त पथकाने परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड यांच्याकडे तत्काळ रिपोर्ट पाठविण्यात आला .

 

तसेच कुरुळा येथे इतर काही शेतकऱ्यांनी काही कृषी सेवा केंद्र धारक चढ्या दराने विक्री करत असल्याचे बोलून दाखवले, मे व्यंकटरमणा कृषी सेवा केंद्र कुरुळा येथे श्री बालाजी शंकरराव चाटे ( चिखलीकर ) कृषी सहाय्यक यांना बनावट ग्राहक म्हणून पाठवले असता व्यंकटरमणा कृषी सेवा केंद्राचे चालक यांनी संबंधितास कापूस बियाण्याचे RCH 659 हे बियाणे 1150 प्रति बॅग (475 ग्रॅम ), RCH 779 हे बियाणे 1200 रुपये प्रति बॅग (475 ग्रॅम ) , व तुलसी कंपनीचे तुलशी 144 या वानाचे बियाणे रुपये 1100 प्रति बॅग ( 475 ग्रॉम ) असे एकूण 3450 रुपयांना विक्री केले .जे की अधिकतम विक्री मूल्य प्रति बॅग 864 रुपये आहे .संबंधित दुकाराने सदरची रक्कम (3450 ) ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली व त्यामुळे संबंधिताने जादा दराने विक्री केल्याचे निष्पन्न झाले .

तसेच व्यंकटरमणा कृषी सेवा केंद्र कुरुळा यांनी बी बियाणे अधिनियम 1966 व 1968 व बियाणे नियंत्रण आदेश 1983 चे उल्लंघन केल्याचे दिसून आले . त्यामुळे वरील दोन्ही दुकानदारांचा रिपोर्ट परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड यांना सादर केला .

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी बापू कृषी सेवा केंद्र कुरुळा व व्यंकटरमणा कृषी सेवा केंद्र कुरुळा यांचा बियाणे परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केलेला आहे . निलंबन कालावधीत संबंधिताला कोणतेही बियाण्याची खरेदी विक्री व्यवहार करता येणार नाहीत .

यावेळी विठ्ठल गीते तालुका कृषी अधिकारी कंधार , गणेश यादव,भारत वाठोरे ,रघुनाथ नाईक , हेमंत थोटे , बालाजी चाटे इत्यादी उपस्थित होते .

तालुक्यामध्ये कोणतेही कृषी सेवा केंद्र धारक एमआरपी पेक्षा जादा दराने विक्री करत असतील तर पुराव्यासह तक्रार दाखल करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गीते यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *