सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी एल मनुरे यांचे निधन

 

धर्माबाद ;प्रतिनिधी

माचनूर तालुका बिलोली ह मु इंदीरा नगर धर्माबाद येथिल सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी एल मनुरे यांचे आज शनिवार दि १४ जुन रोजी रात्री ९ वाजता दरम्यान निधन झाले. मृत्यू समयी ते ८५ वर्षे वयाचे होते. दि .१५ जुन रोजी शनिवारी दुपारी २: वाजता धर्माबाद येथिल स्मशानभुमित त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे .

पी एल मनुरे यांनी एक आदर्श शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली.आजही त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ आहेत.त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

पी एल मनुरे हे संजय पोचिराम मनुरे (मुख्य कार्यालय अधीक्षक, Signal & Telecom, South Central Railway, Nanded Division) यांचे व धर्माबाद चे माजी नगरसेवक राजेश मनुरे यांचे ते वडील आणि शिक्षिका मधुमति बोराळे यांचे सासरे होत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *