मला आरसा व्हायला आवडेल..

मला आरसा व्हायला आवडेल…
बियॉन्ड सेक्स कादंबरीतील मिरा सागर अनेकांना आवडली.. मी स्वतः त्यांच्या विचारांची फॅन झाले.. अशी खरीखुरी माणसे असतील का ??.. असे प्रश्न वाचकांनी उपस्थित केले आणि मी त्याला हो आहेत असं उत्तरही दिलं.. काही माणसे ही युनीक असतात.. काल माझ्या स्वप्नात सागर आला आणि म्हणाला , मला मिराचा आरसा व्हायला आवडेल.. खुप दिवसांत मीरा सागर बद्दल काही लिहीलं नाही म्हणुन तो स्वप्नात आला की काय असं वाटलं.. ती फक्त कादंबरीतील पात्र नाहीत तर माझ्या हृदयाची स्पंदने आहेत हे अनेकदा जाणवतं म्हणुन मिराचा टॅटू हातावर काढताना आणि तिला कायमस्वरूपी माझ्यासोबत मिरवताना मला आनंद होतो..

जेव्हा मिरा स्वतःला आरशात न्याहाळते तेव्हा सागर ला वाटतं फक्त त्यानेच तिला पहावं.. त्यासाठी त्याला आरसा व्हायचय.. जेव्हा त्याच्याशेजारी बसुन ती सिटबेल्ट लावते तेव्हा त्याला तो बेल्ट व्हावं वाटतं.. जेव्हा ती लिपस्टीक लावते तेव्हा त्याला लिपस्टीक व्हावं वाटतं..लेखिका म्हणुन सहज मनात प्रश्न आला आणि मी तो सागरला विचारलाही , मग तुला माणूस म्हणुन कधी जगायला आवडतं ??त्यावर तो म्हणाला , मिराच्या कविता ऐकताना.. जगावं तर तिचे शब्द वेचत.. हसावं तर तिला जपत.. रडावं तर तिला आठवत.. मरावं तर तिला साठवत..

How Romantic ना ??.. पण खरच इतकं प्रेम कोण कोणावर करतं का??.. आणि शरीरापलिकडील प्रेमाचं काय ते कोणाला जमेल का ??हे फक्त कादंबरीतच असतं का ?? अशा अनेक प्रश्नानी वाचकानी मला भंडावुन सोडलं आणि त्यावरही मी ठाम राहिले .. कारण हेही शक्य आहे.. रोज येणारी पावसाची भुरभुर आणि त्या दोघांनी मिळून टेकडीवर लावलेले रोपटे हे मला रोजच खुणावते.. प्रत्येक पानागणिक त्या झाडात भरलेला त्यांचा श्वास मला त्या टेकडीवर ऐकु येतो.. त्यांच्या हृदयाची धडधड माझ्या शब्दातून वहाते आणि कागदावर स्थिरावते.. तु झाड .. मी मुळे.., तु फांदी .. मी फळे, तु वारा .. मी सुगंध , अशा त्यांच्या प्रेमळ आणाभाका वाऱ्यावर हेलकावे घेतात .. जगावं तर मिरासारखं आणि प्रेम करावं तर सागरसारखं..

आज सकाळी टेकडीवर जुना मित्र भेटला.. तो एक महिन्यापूर्वी पुण्यात शिफ्ट झालाय आणि आज अचानक त्याची एंट्री.. टेकडीवर मंदिरात आरती झाल्यावर त्याने सागर मिराची आठवण काढली आणि मी त्या पात्रात घुसले.. घरी आल्यावर अंगणात फुललेली गुलाबी लिली पाहिली आणि तिला मिरा म्हणुन हाक मारली . सचिन म्हणाला ,अगं ती लिली आहे ना.. तुला मिरा कुठून आठवली ??.. मनातच हसले आणि हातवरील टॅटुकडे पहात आरशासमोर जाऊन उभी राहिले ………. तिथे खरच सागर आला असेल ??आरसा होवुन… तुम्हाला काय वाटतं ??
Be Romantic with loved one..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *