Post Views: 341
प्रिय सोनू,
आपला वाढदिवस एक उत्सवच असतो. यावर्षी वडेपुरी येथील रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी अन्नपुर्णा देवीच्या परिसरात वृक्षारोपन करून वाढदिवस साजरा केला आहात. एवढ्या कमी वयातील नायगाव तालुक्यातील अडवळणावरच्या छोट्याशा दरेगावातून अनमोल रत्न स्व. बबन खंडू दरेगावकर यांच्या अनमोल रत्न असणाऱ्या सोनूनी स्वकतृत्वाने आपली जिल्हाभर युवा साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात ओळख निर्माण केली आहे. एखाद्या कार्यक्रमाचे सोनूने केलेले निवेदन कितीहीवेळ ऐकतच राहावे वाटते. वेगळेपण जपणारा निवेदक, अर्थपुर्ण सुभाषिताचा, चारोळ्याचा योग्यतिथे वापर श्रोत्यांना खूप भावतो. शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ या महापुरुषाच्या विचाराने भारलेले व्यक्तिमत्व सतत ग्रंथाच्या दुनयेत रमतांना मी पाहिले आहे.
उत्तम गायक, रोखठोक समिक्षक, संवेदनशील मनाचा लेखक, गोरगरीबाविषयी प्रचंड सहानुभूती व दानत असणारा सोनू सकारात्मकतेच्या वेगळ्या दुनयेत रमतो. जन्मगावाशी नाळ जोडून राहणारा हा युवक वडिलाच्या पुण्यस्मरणार्थ वृध्दांना आधाराची काठी, धोती, लुगडे, साडी, वाटप असेल जगण्याला बळ देणारे गावातील सर्व जातीधर्माच्या वृध्दांना “गावाची नाळ “हा पुरस्कारच्या ह्या आगळ्यावेगळ्या सोहळ्याला मलाही उपस्थित राहता आले. जेवणाच्या मेजवाणी शिवाय गावातील गुणीजनाचा सत्कार, ग्रंथभेट, ज्ञानाची दिवाळी, वृक्षारोपन, शाबासकीची सोनूची थाप आजच्या तरुनाईला प्रेरणादाई तसेच प्रोत्साहन देणारेच आहे.
असे उपयुक्त कार्यक्रम तो सतत घेत असतो. सगळ्या गावकऱ्यांना व परिसरातील, जिल्ह्यातील स्नेहीजनाना या आनंदात सहभागी करून घेतो. समाजात शब्द दारिद्र्य वाढलेले असताना सोनूकडे शब्दाची प्रचंड श्रीमंती आहे हे त्यांच्या कृतीतून दिसून येते. समाजातील मोठी समजलेली लोकं दारू, किंवा नको असणाऱ्या बाबी वाटतील मात्र सोनू हा ज्ञान वाटीत असतो. यावरून त्याची उंची मोठी आहे हे लक्षात येते. सोनू नांदेड जिल्ह्यातील छोट्याशा खेड्यात गरीब कुटूंबात जन्म घेऊन मोठ्या लोकप्रतिनिधी सारखा दरवर्षीच मोठ्या धुमधडाक्यात नाविण्यपुर्ण समाज उपयोगी उपक्रमाने वाढदिवस साजरा करणारा शुन्यातून निर्मिती एकमेव सोनूचीच असावी. अशा ह्या विधायक वृतीने जगणाऱ्या सोनूला 12 जून रोजीच्या वाढदिवसाच्या निमिताने आरोग्यदायी आयुष्य लाभो व प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
साहित्यिक : पंडित पवळे, नांदेड
(राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक)
संपर्क :9890232962