सोलो ट्रॅव्हलर..

 

एका फॉलोवर ने मेसेंजरवर मला मेसेज केला , तुम्हाला सोलो ट्रॅव्हलींग आवडतं का ??.. खरं तर आपण प्रत्येकजण सोलो ट्रॅव्हलरच असतो… या जगात एकटे येतो आणि एकटेच निघून जातो.. प्रत्येकाची त्याच्या कर्मानुसार जर्नी असते.. त्याला आपण जीवन म्हणतो .. आणि जगत असताना अनेक टुरीस्ट आणि अनेक स्टेशन्स आपल्या आयुष्यात येतात.. काही टुरीस्ट त्या प्रवासापुरते म्हणजे काही तास किवा काही दिवस सोबत असतात आणि काही आपल्या हृदयात घर करुन बरेच महिने , बरीच वर्षे सोबत रहातात.. काही माणसाना एकटे राहायला , जगायला आवडतं पण माझ्यासारख्या व्यक्तीला एक कप कॉफीलाही पार्टनर लागतो.. मी एकटी कधीच नसते आणि नसेन.. भगवंत सतत सोबत असतोच…रोज नवीन Bf ( breakfast ) तसच रोज नवीन मित्र जोडायची इतकी सवय लागली आहे की त्यापुढे पैसा , प्रॉपर्टी , फेम शुल्लक वाटते . प्राण्यांशी दोस्ती , कधी निसर्गाची सहल.. झाडांशी गप्पा तर कधी पाण्याशी मस्ती… माझ्या अवतीभवती सतत कोणीना कोणी असतच .. त्यांना देता देता मी अनेक गोष्टी शिकते आणि आनंदी रहाते..
यावरुन अनेक मित्रासोबत माझं भांडण होतं कारण त्यांना एकट्याला माझ्यासोबत वेळ घालवायचा असतो आणि मला एकावेळी अनेक जण सोबत हवे असतात.. मला कधीही एकटीला आनंद घ्यायचा नसतो .. सगळे विषय सगळ्यासोबत शेअर करायचे असतात.. आणि बऱ्याच जणाना सगळ्या गोष्टी लपवुन ठेवायच्या असतात.. आज वटपौर्णिमा आहे त्यामुळे मला दरवर्षीप्रमाणे वडाचं झाड लावायचय त्यामुळे झाड लावायला , व्हीडीओ करायला कोणी ना कोणी सोबत हवच ना.. माझे फोटो काढायला , रील्स करायला मला कोणी ना कोणी लागतं.. ट्रेक ला गेलो आणि तिथे गाडी बंद पडली किवा काही इमर्जन्सी आली तर सोबत कोणीतरी हवं.. गप्पा मारायला , बोलायला कोणीतरी हवं.. सोलो ट्रॅव्हलींग मधे आपण एकटे जातो तसेच तिथे इतर अनेक मंडळी एकटी येतात आणि त्यांची मैत्री होते.. कधी प्रेम होतं .. कधी दुश्मनही होतात म्हणजेच काय भांडायलाही माणूस लागतो.. कौतुक करायलाही माणूस लागतो.. स्वतःची पाठ स्वतः थोपटु शकत नाही त्यासाठीही माणुस लागतो …माझं लिखाण वाचायलाही तुम्ही वाचक हवेत..
माझा एक असाच सरकीट मित्र .. खुप तापट स्वभाव.. मेष रास .. रागात काहीबाही बोलून मित्र तोडायचे आणि मग सोलो ट्रॅव्हलर म्हणुन एकटेच हिंडायचा.. एकदा ४ दिवस एकटाच ट्रेकला गेला होता.. ज्याठिकाणी तो गेला होता तिथे एक गृप आला होता.. त्यामध्ये एक स्त्री होती.. तिच्याशी मैत्री झाली.. ती प्रेयसी झाली आणि ३ वर्षे तो तिच्यासोबत सगळीकडे ट्रेक ला जातो.. तीही त्याच्यासारखीच तिरसट असल्याने दोघांचं मस्त जमलय .. त्याचा सोलो ट्रॅव्हलर म्हणुन सुरु झालेला प्रवास तिरसट ट्रॅव्हलरवर येउन सुरु आहे… आयुष्याची अशी सगळी गम्मत असते.. येतो एकटे जातो एकटे तरीही सगळे सोबत लागतातच..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *