इंजि. विश्वजीत फाउंडेशनच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…! शैक्षणिक मदत भविष्य घडवते, -विश्वजीत गायकवाड

 

(कंधार ; दिगांबर वाघमारे )

शिक्षण, आरोग्य, रोजगार या त्रिसुत्रीनुसार काम करणारी राज्यातील नामांकित सामाजिक संस्था विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनच्या वतीने कंधार येथील रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे (बॅग, वह्या व ईतर) वाटप करण्यात आले, यावेळी माजी खासदार सुनील गायकवाड, फाउंडेशनचे प्रमुख विश्वजीत गायकवाड, उद्योजक वाल्मिक केंद्रे, शुभम गायकवाड, परमेश्वर केंद्रे, मुख्याध्यापक श्री सुभाष मुंडे, दिगंबर वाघमारे, राजहंस शहापुरे, भास्कर कळकेकर,प्रदीप कदम, माधव भालेराव, सिकंदर शेख, रोहिदास सुर्यवंशी, राजीव होंडाळे, श्रीमती शेख, श्रीमती मंजुषा यन्नावार यांच्यासह विद्यार्थी नागरीक उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही परिस्थिती मुळे शिक्षणात अडथळे निर्माण होतात ही बाब लक्षात घेऊन हे अडथळे दूर करण्यासाठी विश्वजीत फाउंडेशन काम करत आहे, त्यांना शैक्षणिक साहित्य व ईतर मदत निरपेक्ष भावनेने करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे, यातूनच येथील विद्यार्थ्यांना ही मदत आम्ही करत आहोत, शिवाय आरोग्य विषयक समस्या, रोजगार निर्मिती यासाठी फाउंडेशन काम करणार आहे, शिक्षणासाठी केलेली मदत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारी असते असे मत यावेळी मनोगतातुन विश्वजीत गायकवाड यांनी व्यक्त केले. माजी खासदार सुनील गायकवाड यांनी आपल्या भाषणात फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले व आगामी काळात गरीब, गरजु व पितृछत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना मदत केली जाईल असे सांगितले.

 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर केंद्रे यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन एकनाथ तिडके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *