“हर घर योग” या रामदेव बाबा यांच्या संकल्पनेतून घराघरात योग पोहोचविणार – योगाचार्य सिताराम सोनटक्के

 

नांदेड : ( दादाराव आगलावे) – ” हर घर योग” या योगकृषी रामदेव बाबा यांच्या संकल्पनेनुसार नांदेड शहरातील प्रत्येक वार्ड आणि प्रभागात घरोघरी योगाचा प्रचार व प्रसार करून येत्या वर्षभरात घरोघरी योग पोहोचविण्याचे काम पतंजली योगपीठ अंतर्गत नित्य योग समिती, भक्ती लॉन्स मंगल कार्यालय यांच्या वतीने केल्या जाणार असल्याचा निर्धार पतंजली योगपिठाचे मान्यता प्राप्त योग्य शिक्षक तथा योगाचार्य सिताराम सोनटक्के यांनी व्यक्त केला आहे.

नुकतेच भक्ती लॉन्स मंगल कार्यालय, मालेगाव रोड येथे भव्य दिव्य असा आंतरराष्ट्रीय योग महोत्सव नित्य योग समिती, भक्ती लॉन्स व भाजपाच्या राज्य महिला उपाध्यक्ष सौ प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या संयुक्त विद्यमाने योगाचार्य सिताराम सोनटक्के यांच्या प्रमुख मार्गदर्शन आणि नियोजना खाली साजरा करण्यात आला. या योग शिबिरास प्रचंड प्रतिसाद लाभला.

घराघरांमध्ये विविध आजारांचे प्रस्त वाढल्यामुळे, ह्या त्रस्त आजारातून लोकांना बाहेर काढण्यासाठी तसेच लोकांना निरोगी जीवन प्राप्त व्हावे आणि स्वदेशी वस्तूंचा प्रचार व प्रसार व्हावा या प्रमुख उद्देशाने योगकृषी तथा पतंजली योग पिठाचे संस्थापक स्वामी रामदेव यांच्या ” हर घर योग” या संकल्पनेनुसार नित्य योग समिती, भक्ती लॉन्स या समितीच्या माध्यमातून नांदेड शहरातील प्रत्येक वॉर्ड आणि प्रभागात योगाचे महत्त्व विशद करून घरोघरी योग पौंचविण्याचा संकल्प योगाचार्य सिताराम सोनटक्के यांनी केला आहे.

 

भक्ती लॉन्स मंगल कार्यालयात गेल्या साडेपाच महिन्यापासून नित्यनियमाने रोज सकाळी साडेचार ते सात या वेळेत योग अभ्यास शिबिर चालू आहे. या शिबिरास दररोज शेकडो महिला व पुरुष यांची उपस्थिती असते. या योग शिबिराच्या माध्यमातून अनेक योगसाधक दुर्मिळ व गंभीर आणि काही प्रमाणात साध्या आजारातून मुक्त झालेले आहेत. घराघरातील व्यक्ती ही निरोगी राहावी, त्यांना आनंदाचे जीवन मिळावे, त्यांना सुखी आणि समाधानी संतूस्ट जीवन प्राप्त व्हावे यासाठी हे त्या वर्षभरात घराघरात योग पोहंचविण्याचे कार्य करणार असल्याचे योगाचार्य सिताराम सोनटक्के यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *