आशाताई शिंदे यांनी केले आत्महत्याग्रस्त बालाजी कल्लारे कुटुंबीयांचे सांत्वन ….! आत्महत्याग्रस्त मयत कल्लारे कुटुंबीयांना आशाताईंची मदत

 

लोहा – प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील मौजे दगडसांगवी येथील अल्पभूधारक शेतकरी मयत बालाजी पंढरी कल्लारे वय वर्ष 45 यांनी सततची नापीकी व आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्याग्रस्त मयत बालाजी कल्लारे यांच्या घरी काल दि. 27 जून गुरुवार रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी भेट देऊन कल्लारे कुटुंबीयास वयक्तिक मदत देऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन केले.

 

या आत्महत्याग्रस्त कल्लारे कुटुंबीयांना भरीव शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे आशाताई शिंदे यांनी संपर्क साधून संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आत्महत्याग्रस्त कलारे कुटुंबीयांना भरीव शासकीय मदत लवकरच मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी कल्लारे कुटुंबीयांशी बोलताना सांगितले

 

यावेळी बोरगावचे सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पाटील बोरगावकर, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रं.विश्वंभर पाटील क्षिरसागर, पारडी माजी सरपंच दिगंबर पाटील डिकळे, समन्वय समिती लोहाचे सदस्य सिद्धू पाटील वडजे, खरेदी विक्री संघाचे संचालक सुधाकर सातपुते, सुरेश पा.फाजगे, भानुदास फाजगे, नितीन फाजगे, संभाजी कलाळे, बळीराम कलाळे, उत्तम फाजगे, हौसाजी बेराडे, कामाजी मोरतळे, तिरुपती बेराडे, संदीप मोरतळे, पांडुरंग फाजगे सह कार्यकर्ते, पदाधिकारी, गावकरी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *