(कंधार ; दिगांबर वाघमारे )
अतिक्रमणाच्या नावाखाली कंधार शहरातील संपूर्ण बाजारपेठ काढून टाकली असल्याने व्यापारी हा देशोधडीला लागला आहे. कंधार शहरातील बस स्थानक ते शिवाजी चौकापर्यंत एकच मुख्य रस्ता असल्याने याच रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे. यातील काही मोठे व्यापारी हे स्थायिक झाले आहेत परंतु विस्थापित छोट्या व्यापाऱ्यांना दुकान नसल्याने मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. शहरात मोठा रस्ता असेल परंतु बाजारपेठ नसेल तर शहराचे महत्व कसे वाढणार हा खरा प्रश्न आहे. रस्त्याच्या बाजूला व्यापाऱ्याने टाकलेली छोटी दुकाणे नगरपालिकेने अतिक्रमण म्हणून पुन्हा पाडून टाकली असल्याने सामान्य व्यापारी हा रस्त्यावर आला आहे. या व्यापाऱ्यांनी दिनांक 1जुलै रोजी सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना भेटून आपल्या व्यथा मांडल्या. यावर प्रा. मनोहर धोंडे यांनी नगर पालीकेच्या मालकी असलेली जागा तिन वर्षासाठी भाडेतत्त्वावर द्या अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका दाखवली आहे.
नगरपालिकेच्या वतीने विस्थापित व्यापाऱ्यांचे प्रत्येक वेळी अतिक्रमण काढले जात असल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. यावर काहीतरी पर्याय व्यवस्था काढा यासाठी व्यापाऱ्याने 30 जून रोजी कंधार येथे बैठक घेऊन प्रा. मनोहर धोंडे यांनी विस्थापित व्यापाऱ्यांना कायद्यानुसार दहा बाय पंधरा फुटाची ची जागा भाडेतत्त्वाने मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले होते. आज दिनांक एक जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना भेटून सर्व बाबी सविस्तर सांगून निवेदन दिले आहे. प्रा. मनोहर धोंडे यांनी भाडेतत्त्वावर कशा पद्धतीने जागा देऊ शकता यासंबंधीची सर्व माहिती जिल्हाधिकारी यांना देऊन यामध्ये व्यापारी व नगरपालिकेचा कसा फायदा आहे. याची सविस्तर माहिती दिली. यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका आहे. व्यापाऱ्याच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कंधार एक ऐतिहासिक शहर आहे. परंतु या शहरात बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत एकच मुख्य रस्ता असल्याने हेच एक मुख्य बाजारपेठ आहे. परंतु गेल्या बारा वर्षापासून अतिक्रमणाच्या नावाखाली नगरपालिका प्रशासन हे व्यापाऱ्यांना कुठेच व्यापार करू देत नसल्याने व्यापारी हातबल झाले आहेत. शॉपिंग सेंटर साठे नगरपालिकेने जागा विकत घेतली आहे परंतु त्यासाठी बजेट नसल्याने म्हणावे त्या कालावधीत बांधकाम होताना दिसत नाही. व्यापारी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.भवानीनगर कमाल ते पानभोसी रोड पर्यंत जिल्हा परिषद च्या ताब्यात मोकळी जागा आहे. पानभोसी रोड ते पशुवैद्यकीय दवाखाना ची मोकळी जागा ही सध्या नगरपालिकेच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषद शाळा ते डा.बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर पर्यंत ही सदरील जागा नगरपालिकेच्या ताब्यात आहे. या शासनाच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या जागेवर दहा बाय पंधरा फुटाची जागा व्यापाऱ्यांना तीन वर्षासाठी भाडेतत्त्वावर द्यावी. सदरील व्यापारी हे पत्राचे शेड मारून तात्पुरता व्यापार करतील. ज्यावेळेस शॉपिंग सेंटर बांधण्याचे काम चालू होईल त्यावेळेस सदरील व्यापारी ही आपले पत्राचे शेड काढून घेतील. यामुळे नगरपालिकेचे आर्थिक उत्पन्नही वाढेल. त्यामुळे कंधार शहरातील व्यापाऱ्यांचा विषय गांभीर्याने लक्ष द्यावे. यामध्ये खाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे,सामाजिक कार्यकर्ते शेख हब्बुभाई, सुनील बासटवार, मधुकर मुसळे, उमाजी पंदलवाड, ॲड शेख मगदुम, ॲड शेख मोहदिन, प्रविण महाजन,शिकूर चौधरी यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते