आगामी विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे* – *सौ. आशाताईं शिंदे

 

सौ. आशाताई शिंदे यांच्या उपस्थितीत कलंबर सर्कलमध्ये जनसंवाद बैठक संपन्न

लोहा ;प्रतिनिधी;

लोहा तालुक्यातील कलंबर सर्कल मधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जनसंवाद बैठक व दौरा काल दि.०७ जुलै रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, यावेळी आशाताई शिंदे यांनी कलंबर सर्कल मधील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या समवेत रायवाडी येथील नंदीचे दर्शन घेतले,यावेळी नंदिकेश्वर मंदिर कमिटी रायवाडीच्या वतीने व कलंबर सर्कल मधील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या वतीने आशाताई शिंदे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

 

यावेळी बोलताना आशाताई शिंदे म्हणाल्या की,आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून तिकीट आपल्यालाच फायनल असून सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आगामी विधानसभेची निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन यावेळी आशाताई शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

 

या जनसंवाद बैठक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पारडीचे माजी सरपंच दिगंबर पाटील डिकळे, शेतकरी कामगार पक्षाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे हरबळकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख शेरूभाई, लोहा कृ. उ. बाजार समितीचे संचालक प्रतिनिधी विश्वंभर पाटील क्षिरसागर, लोहा तालुका समन्वय समितीचे सदस्य सिद्धू पाटील वडजे, शेतकरी कामगार पक्षाचे लोहा तालुका अध्यक्ष नागेश पाटील हिलाल, काबेगावचे सरपंच दुलेखान पठाण, आजमवाडीचे उपसरपंच अशोक गीते, कलंबर चे उपसरपंच माधव मोकले,लोहा बाजार समितीचे संचालक माणिकराव पाटील वाकडे,

जोशीसांगवी सरपंच विक्रम पाटील मोरे, प्रदीप हुंबाड, ज्ञानेश्वर ताटे, पोखरभोसी माजी सरपंच बबरू पाटील ताटे, शेलगाव उपसरपंच रामेश्वर पाटील जाधव, डि.के. कांबळे कलंबरकर, शेकाप अल्पसंख्यांक लोहा तालुका अध्यक्ष फैयाज शेख सह कलंबर सर्कल मधील सरपंच, उपसरपंच ,सेवा सोसायटीचे चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील सह प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, गावकरी मोठ्या संख्येने या जनसंवाद बैठकीस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *