अमरनाथ गुहेतून भाग -२ *(लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर)*

 

आज निघण्याचा दिवस. सकाळी पाच वाजता जाग आली. सोबत घ्यायचे सामान परत एकदा चेक करून घेतले. सर्वांची रेल्वे तिकिटे, यात्रा परची प्रवास सुरू होण्यापूर्वीच पूर्वी वाटप करायचो. पण एकदा एका सहा जणांच्या कुटुंबाने नेमकी त्यांची यात्रा परची घरी विसरले होते. त्यामुळे त्यांना दर्शनाला नेताना अक्षरशः देव आठवले होते. तेव्हापासून मी तिकिटे आणि यात्रा परची माझ्याजवळ ठेवत असतो. सकाळी प्रात्यविधी आटोपून मॉर्निंग वॉक केला.

अपेक्षाप्रमाणे इतर कोणीही यात्रेकरू आले नव्हते. सकाळी नऊ वाजता घरची पूजा करून वडिलांचा आशीर्वाद घेऊन निघालो. घराच्या बाजूला असलेल्या सोन्या मारुती मंदिर व सोमेश कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन घेतले. समर्थाकडे साकडे घातले की,आमची यात्रा नेहमीप्रमाणे सुखरूप पार पडू दे. दरवर्षी यात्रा संपल्यानंतर मावंद्याचा महाप्रसाद स्वामी समर्थ मंदिरात देत असतो. त्यामुळे महाप्रसादासाठी शनिवार दि.३ ऑगस्ट ही तारीख बुक केली. स्टेशनला पोहोचलो तेव्हा पावणे दहा वाजले होते. बरेच यात्रेकरू स्टेशनवर आलेले होते. पूर्व सूचना दिलेली असल्यामुळे सर्वांनी स्काय ब्लू कलरचे टी-शर्ट घातलेले होते. मला पाहताच सर्वांनी बम बम भोले चा जयकारा केला.

गेल्या चार-पाच वर्षापासून नांदेड भूषण संत बाबा बलविंदरसिंघजी हे यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी कार्यवस्ततेमुळे येत नव्हते. त्यामुळे मुद्दामहून छोटा भाऊ राजेशसिंह हा त्यांना घेण्यासाठी गेला. दहा मिनिटाने बाबाजींचे आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात त्यांना स्टेशनमध्ये आणले. तदनंतर बाबाजींच्या हस्ते सर्व अमरनाथला यात्रेकरूंचा सिरोपाव, मोत्याची माळ आणि प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी अरुण काबरा, प्रकाश उंटवाले, विलास वाडेकर, संतोष भारती, सुरेश कुलकर्णी, सविता काबरा, प्रा.लक्ष्मी पुरणशेट्टीवार, शशिकांत कुलकर्णी यांनी सर्व यात्रेकरुंवर पुष्पवृष्टी केली.यात्रे दरम्यान अन्नदान करणारे नवनाथ सोनवणे,नागेश शेट्टी,हृदयनाथ सोनवणे,सुभाष बंग,नारायण गवळी, रेखा भताने, वंदना सुरेश त्रिमुखे,श्याम हुरणे, गोरखनाथ सोनवणे,अमोल गोळे,प्रदीप शुक्ला,प्रताप फोजदार , ज्ञानोबा जोगदंड ,सरदार जागीरसिंघ,सरदार कुलदीपसिंघ, श्याम हुरणे,श्रीपतराव नेवळे पाटील, डॉ.अजयसिंग ठाकूर ,मनोज शर्मा ,स्नेहलता जायसवाल,द्वारकादास अग्रवाल, प्रियंका गजानन मामिडवार, वसंतराव कल्याणकर,आनंद साताळे,व्यंकटराव वायगावकर,गंगाधर श्रीराम मामडे , सुरेखा रहाटीकर, जगन्नाथ सोनवणे यांचा स्मृतिचिन्ह देऊन बाबाजींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे नांदेड जिल्हा केमिस्ट व ड्रगिष्ट्र असोशियन तर्फे मोफत औषधी दिल्या होत्या.त्याबद्दल सदानंद मेडेवार यांचा सन्मान करण्यात आला.चंद्रकांत कदम यांनी नाष्टा तर मायादीदी अत्रे यांनी मिनरल वॉटर ची व्यवस्था केली. यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी भाजपा,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, आर्ट ऑफ लिविंग, मारवाडी युवा मंच, लायन्स क्लब, माहेश्वरी जिल्हा संघटना, एन्जॉय स्विमिंग ग्रुप, शिवा संघटना, शिवसेना, अमरनाथ यात्री संघ, पतंजलीचे सदस्य मोठ्या प्रमाणात आले होते.

आम्ही पाच सहा जण सोडलं तर बाकी सर्वजण पहिल्यांदाच यात्रेला येत होते. त्यांना निरोप देण्यासाठी आलेले नातेवाईक चिंतेत होते. पण आमचा बिंधास्तपणा बघून ते निश्चिंत झाले. काहींनी ढोल ताशाच्या गजरात भांगडा देखील केला. संपूर्ण स्टेशन भोले मय झाले होते. गळ्यात बरेच पुष्पहार पडल्यामुळे मान दुखू लागली. फोटो साठी अनेकांनी आग्रह धरल्या मुळे बऱ्याच सेल्फी काढून झाल्या. काहींनी रिल्स देखील बनविले. सर्वांचा निरोप घेऊन अकरा वाजता आम्ही नांदेड सोडले.

 

पूर्णा स्टेशनवर नेहमीप्रमाणे भाजपचे शहराध्यक्ष डॉ. अजयसिंह ठाकूर हे कार्यकर्त्यांसोबत स्वागताला हजर होते. पुर्णेचा प्रसिद्ध मसाला वडा आणि बिसलरी बॉटल त्यांनी सर्वांना दिले. गेल्यावर्षी आमच्यासोबत यात्रा केलेले जयस्वाल परिवार आवर्जून भेटीसाठी आले होते. पूर्णा स्टेशनवर पाऊस सुरू झाला असल्यामुळे त्यांचा थोडासा हिरमोड झाला. गाडी सुरू झाल्यानंतर सर्व यात्राकरुंनी मसाला वड्याचा आस्वाद घेऊन झोप काढली.बलभीम पत्की, कुमार कुलकर्णी, बालाजी जाधव, मृदुला पत्की यांनी सर्वांना आयकाचे वाटप केले. सुभाष देवकते, कल्याण शिरसिकर, अशोक गरुडकर यांनी बॅग ला लावायचे टॅग सर्वांना वाटप केले. आम्ही नव्वद यात्रेकरू बि टू पासून बी तेरा पर्यंत विविध बोगीमध्ये प्रवास करीत होतो. त्यांना जेवण व इतर पदार्थ देण्यासाठी नारायण गवळी, संजय राठोड,श्रीकांत मुखेडकर,सचिन उल्लेवाड यांनी पुढाकार घेतल्यामुळे सर्व व्यवस्थित पार पडले.

संध्याकाळी भजन संध्या सुरू केली. सुरुवातीला कोणीच पुढे येत नसल्यामुळे हे भोळ्या शंकरा भजन मी चालू आणि बघता बघता अशी मैफिल जमली की विचारू नका. आमचे तिन्ही कंपार्टमेंट गच्च भरले होते. आमचा भजनाचा जल्लोष पाहून काही पंजाबी यात्रेकरू देखील आमच्यात सामील झाले. किती सांगू मी सांगू कुणाला या सुपरहिट भजनावर सर्व महिलांनी एकत्रित डान्स केल्यानंतर भजन संध्या संपली.रात्री खंडव्याला आमच्या सोबत असणाऱ्या रेखाताई भताने यांच्यातर्फे भोजनाची अतिशय सुंदर व्यवस्था करण्यात आली होती.दोन तास कधी गेले हे कळाले सुद्धा नाही. रात्री साडेदहाच्या सुमारास निद्रादेवीच्या कुशीत विसावलो.

*(क्रमशः)*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *