अहमदपूर (भगवान आमलापुरे )
आज दिनांक 9 रोजी मौजे- काळेगाव येथे बीबीएफ व टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड पीक प्रात्यक्षिकची पाहणी श्री सचिन बावगे तालुका कृषी अधिकारी अहमदपूर यांनी केली यावेळी बीबीएफ मुळे शेतकऱ्यांना ज्यावेळेस पाऊस कमी पडतो त्याचवेळेस जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी उपयोग होतो आणि पाऊस जास्त झाल्यास त्याच जमिनीतून पावसाचे पाणी बाहेर काढून देण्यासाठी दांडाचा उपयोग होतो,यामुळे आज काळेगाव येथील शेतकऱ्यांना बीबीएफ मुळे पिकाची कशी वाढ होते, पिकामध्ये हवा खेळती राहते, किडीचा प्रादुर्भाव कमी होतो,उत्पादन खर्च कमी होतो हे फायदे दाखवून दिले
याचबरोबर टोकन लागवड केल्यामुळे शेतकऱ्यांना प्रति एकर 7 ते 8 किलोच बियाणे लागते आणि बियाणाच्या खर्चात बचत होते असे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दर्शनी सांगितले त्यासोबत टोकन लागवड केलेल्या दौलत जाधव यांच्या प्लॉटवर भेट दिली. प्लॉट मध्ये पेरणी पासून पाऊस कमी होता पिकाला ओलाव्याची गरज होती बिबिएफ व टोकण सरीमध्ये पाणी सुरुवातीच्या पावसाचे साचून राहिलेल्या ठिकाणी जमिनीतील ओलावा टिकून राहिला तेथे पिकांची उंची जास्त दिसून येते त्याच सरीमध्ये उताराच्या ठिकाणी पिकांची उंची कमी दिसून आली ही तफावत शेतकऱ्यांना प्लॉट मध्ये दाखवली आणि बिबिएफ प्लॉट मध्ये सुध्दा दांडा जवळची पिके जास्त उंच आहेत,ऊंची अधिक दिसून आल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत होते, हे तंत्रज्ञान कृषि विभागाणे वेळेवर प्रचार करुण सांगीतले यामुळे आमचा लागवड खर्च कमी झाला अवर्षन काळात पिकाचे संरक्षण झाले यावेळी प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र पाटील, पंपू पाटील, हनुमंत जाधव,
रमाकांत साळवे, किशन गायकवाड, असिफ सय्यद, लक्ष्मण जाधव यांचा सोबत शेतावर पाहणी केली, सचिन बावगे यांनी शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचाशेती मध्ये वापर करून उत्पादवाढीसाठी लागणारे तंत्रज्ञान कृषि सहाय्यक यांच्याकडून आवगत करुण घेऊन अधिक उत्पादन घ्यावे असा संदेश दिला.गावचे कृषी सहाय्यक भारती मुरलीधर यांनी उपस्थित शेतकरी यांना किड रोग नियत्रंण या विषयाची माहिती दिली.