कंधार/प्रतिनिधी
माजी जि. प.सदस्य प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कंधार-लोहा तालुक्यातील रुग्णावर मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प केला होता. या उपक्रमात आतापर्यंत दोन हजार रुग्णावर यशस्वी मोतीबिंदू व डोळ्याच्या पडद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी दिलेला शब्द पाळला.
डॉ.भाई केशवराव धोंडगे यांनी आयुष्यभर समाजातील गोरगरीब,बहुजन आठरा पगड जाती धर्मातील लोकांसाठी काम केले. गोर – गरिब, दीन – दलितांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटले. डॉ.भाई धोंडगे यांच्या सामाजिक कार्याचा वसा व वारसा प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे पुढे चालवत असल्याची चर्चा यानिमित्ताने कंधार- लोहा तालुक्यातील जनतेतून ऐकावयास मिळत आहे.दोन्ही तालुक्यातील जनतेनी दिवंगत भाईंवर खुप आणि भरभरून प्रेम केलं.
वयोमानानुसार ज्यांची दृष्टी कमी झाली अशांना नवी दृष्टी देऊन अंधमुक्त करण्याचा संकल्प मनापासून पुर्ण करण्याचा प्रयत्न केला.आणि आज पर्यंत दोन हजार रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तालुक्यातील गोर गरीब जनता जनार्दन मायबापांना या उपक्रमाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करत असल्यामुळे सर्वच स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
दिवंगत डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सुरू केलेला अंधमुक्तीचा संकल्प तालुक्यातील नऊ सर्कल पूर्ण झाले आहे.आतापर्यत दोन हजार रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे.कंधार आणि लोहा शहरातील रुग्णांची शस्त्रक्रिया २२ जुलैच्या अगोदर पूर्ण होणार आहेत.शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मी भेटतो तेव्हा ते दोन्ही हातांनी आशीर्वाद देतात.याच्या एवढा आनंद आणि सुख कुठेही नाही.यामध्येच “खरा परमार्थ” आहे,असे प्रा. डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.